केरकर स्मृती संगीत महोत्सव

कला अकादमीचा २३१वा ‘सुरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत महोत्सव’ दि. १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. दोन दिवस असणारा हा महोत्सव दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

Updated: Nov 18, 2011, 03:10 PM IST

झी २४ तास वेब टीम, पणजी

कला अकादमीचा २३१वा ‘सुरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत महोत्सव’ दि. १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे.  दोन दिवस असणारा हा महोत्सव दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

 

या महोत्सवाचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता कला अकादमीचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते होईल. उद्घाटनानंतर प्रथम सत्रात सोलापूर येथील भिमण्णा जाधव सुंद्रीवादनाची मैफल सादर होईल. त्यानंतर कला अकादमीच्या हिंदुस्थानी संगीत व नृत्य विभागाच्या विद्यार्थ्यांचं गायन, वादन तसंच नृत्याचा ‘त्रिरंजनी’ कार्यक्रम सादर होईल. प्रख्यात गायिका देवकी पंडित यांचं शास्त्रीय गायन सादर करतील. प्रथम सत्राची सांगता नामवंत गायक पं. उदय भवाळकर यांच्या ध्रुपद गायन मैफलीने होईल.

 

दि. १३ रोजी सकाळी द्वितीय सत्र सुरू झालं. गोमंतकीय गायिका डॉ. गौरी नायक भट शास्त्रीय गायन सादर करतील. या सत्राचा समारोप विश्वविख्यात कलाकार पं. विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणा वादन मैफलीने होणार आहे.

 

समारोपाच्या सायं. ४ वा. सुरू होणा:या अंतिम सत्रात मुंबई येथील नृत्यांगना आदिती भागवत यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण होईल. त्यानंतर युवा प्रतिभाशाली गायक कलाकार ओंकार दादरकर यांचे शास्त्रीय गायन होईल. समारोपाची सांगता ख्यातनाम तबलावादक व पद्मभूषण शोभा गुर्टू यांचे सुपुत्र पं. त्रिलोक गुटरू (तबला व ड्रम्स) व रवींद्र च्यारी (सतार) यांच्या सोबतीने ‘साउंड ऑफ फाइव्ह इलेमेंट्स’ या वाद्यमैफलीने होणार आहे.

या सर्व कलाकारांना पं. कालीनाथ मिश्रा, हिमांशू महंत, तुळशीदास नावेलकर, झंकार कुलकर्णी, दयानिधेश कोसंबे (तबला), संगीता मिश्रा (सारंगी), राया कोरगावकर, अतुल फडके, दिलीप गडेकर, नागनाथ नागेशी (संवादिनी), सायली तळवलकर (गायन) यांची साथसंगत लाभणार आहे.

Tags: