ख्यातनाम आसामी गायक आणि संगीतकार भूपेन हजारिका यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन झालं. हजारिका हे दीर्घकाळ आजारी होते आणि गेले काही त्यांना दिवस मुंबईतील अंधेरीच्या कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
आज सायंकाळी साडे चारच्या सुमारास किडनीच्या विकाराने त्यांचे कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले.
हजारिका यांना २००१ मध्ये पद्मभूषण, १९९२ साली दादासाहेब फाळके आणि २००९ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. रुदाली या सिनेमासाठी एशिया पॅसिफिक सर्वात्कृष्ट संगीतकार पुरस्कार प्राप्त करणारे ते एकमेव भारतीय होते.