www.24taas.com, नांदेड
पुणे बॉम्बस्फोटानंतर एटीएसने आपला मोर्चा पुन्हा मराठवाड्याकडे वळवला. त्यामुळे इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्याच्या संशयावरून चार तरुणांना औरंगाबाद-नांदेड येथील एटीएसच्या पथकांनी शुक्रवारी नांदेडमध्ये अटक केली. चौघांना औरंगाबादेत आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
मराठवाड्यात सिमीचे मोठे नेटवर्क आहे. त्यात आता इंडियन मुजाहिदीनच्या स्लीपिंग सेलची भर पडली आहे. औरंगाबादशिवाय बीड, जालना आणि नांदेड ही या संघटनांची सेंटर्स आहेत. त्यापैकी नांदेडमध्ये शुक्रवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
महंमद सादेक महंमद फारुक (27), महंमद मुजम्मिल अब्दुल गनी (29), महंमद इलियास महंमद अकबर (28) आणि महंमद इरफान गौस अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.