www.24taas.com, झी मीडिया, जालना
महिलांवर अत्याचार करणा-या नराधमांचा समाचार घेताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ आज पुन्हा एकदा घसरली. बलात्कार करणा-यांना जरब बसवण्यासाठी त्यांनी जो कठोर उपाय सुचवलाय, तो चक्क तालिबान्यांची आठवण करून देणारा आहे. उपमुख्यमंत्रीपदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीने अशी भाषा करणं, कितपत योग्य आहे, असा सवाल निर्माण झालाय... अजितदादा नेमकं काय बोलले, हे त्यांच्याच तोंडून ऐकूया... पाहा व्हिडिओ....
आईवडीलांनी मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे. कुठल्याही महिलेकडे त्याने आई म्हणूनच बघितलं पाहिजे, मात्र तरीही तो नालायक निघाला तर त्याच काय कापून टाकायला पाहिजे हे तुम्हाला समजलंय असंही वक्तव्य अजित पवार यांनी केलंय.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे -अजित पवार
मला आरक्षणाबाबत राजकारण करायचं नाही मात्र गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
ओबीसींवर अन्यान न होता मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे या मताचा मी आहे. राणे समितीचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ असाही अजित पवार यावेळी म्हणाले.
अध्यादेश काढून राज्यात तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सर्वच ग्रामपंचायतींच रुपांतर नगरपालिकेत करणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केलीय. याशिवाय मदरशाच्या धर्तीवर राज्यातील २०० वारकरी संस्थांना अनुदान देऊन तीर्थक्षेत्रांच्या पालखी रस्त्यावर शौचालये बांधणार असल्याच अजित पवार म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.