www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
गोपीनाथ मुंडे यांचं दिल्लीत अपघाती निधन झालं होतं. यानंतर बीड जिल्ह्यातील परळीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, यावेळी गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू संशयित असल्याचं म्हटलं होतं, कार्यकर्त्यांनीही यावेळी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
कार्यकर्त्यांच्या भावना असतील, तर सीबीआय चौकशी होण्यास काहीही हरकत नाही, असंही शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्यासाठी सरकारकडे शिफारस केली होती.
गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत 3 जून रोजी पहाटे अपघात झाला होता, एअरपोर्टला जात असतांना एका गाडीने त्यांच्या कारला धडक दिली होती. यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर, गोपीनाथ मुंडे यांना एम्सच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.