स्त्री अभ्यास केंद्र : डेटा एन्ट्री ऑपरेटर-अटेंडेट भरती

यु.जी.सीच्या पंचवार्षिक योजने अंतर्गत पाच वर्षाच्या ठराविक कालावधीसाठीची पदे डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि अटेंडेट या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

Updated: Apr 3, 2013, 11:46 AM IST

www.24taas.com, नांदेड
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ महाराष्ट्र शासन स्त्री अभ्यास केंद्र अंतर्गत वुमेन स्टडीज् सेंटर करीता यु.जी.सीच्या पंचवार्षिक योजने अंतर्गत पाच वर्षाच्या ठराविक कालावधीसाठीची पदे डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि अटेंडेट या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांकडून शुक्रवार दि. १२.०४.२०१३ पर्यंत विद्यापीठाच्या विहित नमुन्यात आवेदनपत्र मागविण्यात येत आहेत.
स्त्री अभ्यास केंद्र
डेटा एन्ट्री ऑपरेटर (५२००-२०२०० ग्रेड पे रू. २४००) (एक पद) - खुला
किमान वयोमर्यादा १८ वर्ष ते कमाल ३३ वर्ष राहणार आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. मराठी आणि इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. शासन मान्य MS-CIT उत्तीर्ण.

अटेंडेंट (४४४०-७४४० ग्रेड पे रू. १६००) (एक पद) - खुला
किमान वयोमर्यादा १८ वर्ष ते कमाल ३३ वर्ष राहणार आहे. एच. एस. सी उत्तीर्ण. पात्र उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज संपूर्ण माहिती भरून आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायाप्रतीसह. अर्ज रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे पाठवावेत.
अधिक माहितीसाठी www.srtmun.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.