गोंदियात पारंपरिक पिकाला फाटा देत आंब्याची नर्सरी

गोंदिया सारख्या धान उत्पादक क्षेत्रात पारंपरिक पिकाला फाटा देत एका शेतकऱ्याने आंब्याची नर्सरी तयार केलीय. या नर्सरीत जवळपास आठ जातीच्या आंब्यांच्या रोपांवर ते कलम करतात. आंब्या व्यतिरिक्त ते सर्सरीत चिकू, अशोक, मिर्ची, फणसाच्या झाडांची देखील कलम कलम करतात. एवढच नव्हे तर केळीच्या बागेतून ते लाखोंचा नफा कमवत आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 11, 2013, 05:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, गोंदिया
गोंदिया सारख्या धान उत्पादक क्षेत्रात पारंपरिक पिकाला फाटा देत एका शेतकऱ्याने आंब्याची नर्सरी तयार केलीय. या नर्सरीत जवळपास आठ जातीच्या आंब्यांच्या रोपांवर ते कलम करतात. आंब्या व्यतिरिक्त ते सर्सरीत चिकू, अशोक, मिर्ची, फणसाच्या झाडांची देखील कलम कलम करतात. एवढच नव्हे तर केळीच्या बागेतून ते लाखोंचा नफा कमवत आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी इथल्या देवाजी बनकर यांनी आंब्याच्या नर्सरीच्या माध्यमातून त्यांनी अनेक रोपांवर कलम केली आहेत. बनकर हे १९९४ पासून नर्सरीचं काम करतात. यंदा त्यांच्या नर्सरीत जून २०१२ मध्ये लागवड केलेली ८ हजार आंब्याची कलमी रोपं तायर आहेत. तर यंदाच्या जून महिन्यात सहा हजार आंब्याची कलमी रोपं त्यांनी तयार केली. आंब्याशिवाय त्यांच्या नर्सरीत चिकूची रोपं आहेत.
खिरणी नावाच्या झाडावर ते चिकूच्या रोपांची कलमं करतात. नर्सरीत तयार होणारी रोपं बनकर हे सरकारला आणि इतर ठिकाणी विक्रि करतात. आंबा आणि चिकूच्या एका रोपासाठी ते सरासरी ४० रूपये दराने विक्री करतात. पाण्यासाठी त्यांनी शेडनेट हाऊसमध्यो फोगर लावले आहेत.
बनकर यांनी आपल्या एक एकरात नोव्हेंबर २०१२ मध्ये जी ९ वाणाची टिशू कल्चरची केळी लावली. या एका एकरात किमान १५०० केळीची झाडे आहेत. बनकर यांना शेतीतील उत्कृष्ठ कार्याबद्दल २००२मध्ये शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला. वयाची साठी पार केलेल्या बनकर यांनी तरूणांपुढे आदर्श ठेवला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.