नांदेड पालिका काबीज, अशोकरावांच्या कामाचं होणार चीज?

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी आपला करिष्मा दाखवला आणि पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे.

Updated: Oct 15, 2012, 06:13 PM IST

www.24taas.com, नांदेड
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी आपला करिष्मा दाखवला आणि पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहमत मिळवत सत्ता काबीज केली आहे.
पालिकेतील एकून ८१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक ४१ जागा जिंकल्या. या निवडणुकीतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडाला असून त्यांना केवळ १० जागांवर यश मिळाले. शिवसेनाने १४ जागा जिंकल्या आहेत. हैदराबादस्थित मुस्लीम इत्तेहादुल मजलिस (एमआयएम) या पक्षाने ११ जागा जिंकत सर्वांना धक्का दिला आहे. अपक्षांनी तीन तर, भाजपने २ जागा जिंकल्या आहेत.
अशोक चव्हाण यांना विरोधक कोंडीत पकडणार असं वाटत होतं. मात्र विरोधकांना नाकारून नांदेडवासियांनी पुन्हा एकदा काँग्रेसवरच विश्वास दाखवला आहे.