www.24taas.com, औरंगाबाद
हिंदू देवतांविषयी अनुद्गार काढणाऱ्या एमआयएम प्रमुख आणि खा. अकबरुद्दीन ओवैसी यांना औरंगाबादमध्ये सभा घेण्ययास बंदी घालण्यात आली आहे. या गोष्टीवर नाराजी व्यक्त करताना आपल्याला जास्त दिवस कुणी गप्प बसवू शकत नाही, असा इशारा दिला.
खा. ओवैसी हजरत बावीस ख्वाजा यांच्या दर्ग्य़ावर दर्शनासाठी आले होते. यावेळी बोलताना ओवैसी यांनी आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं. मला फार काळ कुणी गप्प बसवू शकणार नाही, असा इशाराही दिला. ओवैसी यांना दोन मार्चपर्यंत औरंगाबादमध्ये सभा घेण्यास तसंच प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या बद्दल ओवैसींनी जाहीर निषेध नोंदवला.
अकबर ओवैसी यांच्या वादग्रस्त भाषणामुळे त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. ओसी यांचं भाषण धार्मिक तेढ निर्माण करू शकतं. याचा विचार करून औरंगाबाद पोलिसांनी ओवैसी यांना दोन मार्चपर्यंत औरंगाबादमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.