www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
‘चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले... होय, होय चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले…’ असा दावा काही भक्तांनी केला आणि हो हो म्हणता ही खबर साऱ्या गावात पसरली.
‘मंगळवारी रात्री चंद्राच्या प्रतिमेकडे पाहत असताना साक्षात शिर्डीच्या साईबाबाचंच दर्शन झालं’ असा दावा काही भक्तांनी केला होता. ही श्रद्धा की अंधश्रद्धा याच्या भानगडीत न पडता ही बातमी औरंगाबादमध्ये काही क्षणातच पसरली. साईभक्तांनी एसएमएस करून साईभक्तांनी हा एकाला कळवलेली ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरत होती. सिडकोतील राजेश नंद आणि ज्ञानेश्वर सोनवणे यांनी हे दृश्य बघितल्याचं सांगितलं जातंय. त्यांनी तातडीने त्यांच्या मित्रांना फोन करून दर्शन घेण्याचा सल्ला दिला.... मग, मिलकॉर्नर भागातील रहिवासी शेख रईस यांनाही बाबांचं चंद्रात ‘लाईव्ह’ दर्शन झालं.
... आणि मग काय, खरे साईबाबा कसे दिसतात, हे पाहण्यासाठी रांगच रांग लागली. चंद्राला पाहण्यासाठीही काळ्या रंगाच्या चष्म्याचं ‘फॅड’ लोकांना लागलं. अनेकांनी याबद्दल कुतूहल व्यक्त केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.