www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबादचा गड अबाधित राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ३१ डिसेंबर २०१३ ला शिवसेना खासदार चंद्रकांत खैरै आणि भाजप नगरसेवक संजय केनेकर यांच्या हाणामारी झाली होती. त्यामुळे युतीमध्ये दरार पडण्याची शक्यता होती. यावरून दोन्ही बाजुने तोडगा काढून झालं गेलं गंगेला मिळालं सांगून सेटेलमेंट करण्यात आलेच.
खासदार चंद्रकांत खैरै आणि नगरसेवक संजय केनेकर मारहाण प्रकरणी दोन्ही पक्षांची औरंगाबादेत बैठक झाली. खासदार चंद्रकांत खैरै आणि रावसाहेब दानवे यांनी ही बैठक घेतली. यात मारहाण प्रकरणाच्या वादावर पडदा टाकण्यात आलाय.
झालं गेलं गंगेला मिळालं, असं दोन्ही नेत्यांनी बैठकीनंतर सांगितलं. त्याचबरोबर केणेकरांच्या वर्तनाची तक्रार वरिष्ठांकडे केल्याचंही खैरैंनी सांगितलंय. युती अभेद्य राहावी, अशीच इच्छा असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं. पण मारहाणीचं खरं कारण गुलदस्त्याच राहिलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.