www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
साईड स्टँड खाली असताना गाडी चालवाल तर धोका संभावतो. मात्र हा धोका दूर केलाय औरंगाबादच्या एका शाळकरी विद्यार्थ्यानं. अवघे वीस रुपये खर्च करुन आदित्य उबाळे या विद्यार्थ्याने हा आविष्कार शोधलाय.
घाईगडबडीत बाईकचा साईड स्टँड लावला नसल्याने अनेक अपघात झालेत. त्यामुळं अनेकांना आपले प्राणही गमवावे लागलेत, अशा परिस्थितीत बाईक साईड स्टँडवर उभी करणं गरजेचं असतं. मात्र अनेकदा नेमका त्याचाच आपल्याला विसर पडतो यातून सुटका व्हावी म्हणून औरंगाबादच्या आदित्य उबाळे या शाळकरी विद्यार्थ्यानं पर्याय शोधलाय.. इतकाच नाहीतर अवघ्या २० रुपयांत साईड स्टँडची समस्या त्यानं दूर केलीय.
त्याचा हा शोध फक्त मागे गिअर असणा-या बाईक्सनाच नाही तर पुढं गिअर असणा-या बाईक्सलाही उपयुक्त ठरणार आहे, असे विद्यार्थी आदित्य उबाळे यांने सांगितले.
या साईड स्टँडमुळं आदित्यच्या वडिलांचा अपघात झाला होता.. अनेकदा काळजी घेऊनही विसरभोळेपणा आणि कामाच्या गडबडीत साईड स्टँडचा अनेकांना विसर पडतो.. मात्र आता आदित्यनं लावलेल्या या शोधाचा औरंगाबादच्या बाईकस्वारांनी फायदा घेतलाय.
आपल्या वडिलांना झालेल्या अपघातामुळं आदित्यला ही कल्पना सुचली.. त्याच्या अवघ्या वीस रुपयांतील आविष्कारामुळं साईड स्टँडमुळं होणारे बाईक अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.