एवढी छोटी बाईक कधी पाहिलीत का तुम्ही?

औरंगाबादमधील मेकॅनिकल इंजिनीअरिंगला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या शेख अफरोजने आपल्या कल्पनेतून चक्क १० x १० इंचाची गाडी तयार केलीय. या गाडीची नोंद लवकरच ‘लिम्का बुक ऑफ रेकोर्ड’मध्ये केली जाणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 24, 2013, 03:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबादमधील मेकॅनिकल इंजिनीअरिंगला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या शेख अफरोजने आपल्या कल्पनेतून चक्क १० x १० इंचाची गाडी तयार केलीय. या गाडीची नोंद लवकरच ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये केली जाणार आहे.
अफरोजने इंटरनेटवर तेरा इंचाची सर्वात लहान गाडी बघितली आणि यापेक्षा छोटी गाडी बनवण्याची त्याची इच्छा झाली. त्याच इच्छाशक्तीतून त्याने चक्क १० x १० इंचाची गाडी तयार केली. ही गाडी तयार करण्यासाठी लहान मुलाच्या सायकलची चेसीज् वापरून त्यात बारा व्होल्टची मोटर वापरण्यात आली आहे. ही मोटर एका बॅटरीवर चालते.
यापूर्वी आफरोजने २०११ मध्ये इंजिनीअरिंग प्रोजेक्ट करताना पेट्रोलवर चालणारी सायकल, सन २०१२ मध्ये सोलार ऊर्जेवर चालणारी टू व्हीलर आणि जानेवारी २०१३ मध्ये पाण्यावर चालणारी टू व्हिलरची प्रायोगिक तत्त्वावर गाडीची निर्मिती केली आहे.
‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने नोंद घेण्यासाठी अफरोजने अर्ज केलाय. याआधी बंगळूरुच्या संतोष कुमार याने अशीच १३ इंचाची छोटी गाडी बनविल्याची नोंद आहे.

व्हिडिओ पाहा :-

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.