बाळासाहेबांसाठी बॉलिवूडने ट्विटरवरून ढाळले अश्रू

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. मुंबईमध्ये तर अघोषित बंद पुकारला गेला आहे. बाळासाहेबांना भेटायला गेले दोन दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते बॉलिवूडच्या कलाकारांपर्यंत प्रत्येक मातोश्रीवर दाखल होत होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर मायानगरी बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. ट्विटरमार्फत बॉलिवूडने आपली श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 17, 2012, 09:37 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. मुंबईमध्ये तर अघोषित बंद पुकारला गेला आहे. बाळासाहेबांना भेटायला गेले दोन दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते बॉलिवूडच्या कलाकारांपर्यंत प्रत्येक मातोश्रीवर दाखल होत होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर मायानगरी बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. ट्विटरमार्फत बॉलिवूडने आपली श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
मधुर भंडारकर- ईश्वर बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती देवो. ज्या गोष्टींवर त्यांनी विश्वास ठेवला, त्या गोष्टींसाठी ते कायम दृढनिश्चयाने लढले. यामुले ते एक महान नेतृत्व ठरले. बाळासाहेबांची निरीश्रणशक्ती अफाट होती आणि बोलताना कुणाचाही मुलाहिजा बाळगत नसत. ठाकरे कुटुंबियांना हा आघात सोसण्याची देव शक्ती देवो..

हृतिक रोशन- मी आज जेव्हा मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटलो, तेव्हा माझ्या मनात एकच प्रार्थना चालू होती, की देव बाळासाहेबांना उदंड आयुष्य देवो. ईश्वर बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना तसंच शिवसैनिकांना हा आघात सहन करायची शक्ती मिळो
दिया मिर्झा- ईश्वर बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती देवो.
गुल पनाग- RIP RT @ ANI_ news बाळासाहेबांनी दुपारी 3.30 वाजता अखेरचा श्वास घेतला
सुहेल सेठ- ईश्वर बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती देवो.
शिरीष कुंदर- ईश्वर बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्यास शांती देवो
नेहा धुपिया- ईश्वर बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती देवो.
रणदीप हूडा- ईश्वर बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती देवो... नुकसान झालं!!! एक पर्वतप्राय व्यक्तिमत्व, विपर्यासांचा महासागर... पण कुठलीच भूमिका न घेणाऱ्या आमच्यासारख्यांना इतकं खोलवर दुःख कधीच झालं नाही.
विवेक ओबेरॉय- महाराष्ट्राचा गरजणारा वाघ अखेर शांत झाला! आमच्या प्रर्थना ठाकरे कुटुंबिय आणि लाखो शिवसैनिकांसोबत आहेत.
सिद्धार्थ- बाळासाहेब ठाकरे निधन पावले आहेत. जर तुम्ही जन्माने मराठी नसाल, तर तुम्ही मराठी लोकांचं हे दुःख त्यांच्याकडून चोरलेलं बाळासाहेबांना आवडणार नाही.
अफताब शिवदासानी- आणखी एक दंतकथा हरपली. बाळासाहेब ठाकरेंनी भावपूर्ण श्रद्धांजली.. ईश्वर बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती देवो... ओम साई राम
राज कुंद्रा- ईश्वर बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती देवो... मुंबईबद्दल मला जे काही थोडं थोडकं माहिती आहे, त्यावरून मी म्हणेन.. ‘एक था टायगर’… लाखो लोकांनी अनुकरण करावं, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.

रजनीकांत- बाळासाहेब माझ्यासाठी ईश्वराप्रमाणे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
रितेश देशमुख- बाळासाहेब खरे हिरो होते. जनतेनं त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं. त्यांचं अनुकरण केलं आणि त्यांचा आदर्श ठेवला. ईश्वर बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्यास शांती देवो.
अजय देवगण- बाळासाहेब म्हणजे ध्येयासक्त आणि द्रष्टा व्यक्तिमत्व. ईश्वर बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती देवो.
हेमा मालिनी- एक युद्ध संपलं आणि अमर आयुष्य सुरू. बाळासाहेब ठाकरेंच्या ठाकरेंच्या कुटुंबाला सांत्वन.. माझ्या शुभेच्छा आणि प्रार्थना नेहमीच त्यांच्यासोबत राहतील.
शोभा डे- महाराष्ट्राचा सर्वशक्तिमान वाघ आज आपल्यातून गेला. बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्यास शांती देवो.
रणवीर शौरी- एका वाघाचा मृत्यू. ईश्वर बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्यास शांती देवो.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x