मी व्हेटिंलेटरवर नाही - बाळासाहेब

लाखो करोडो शिवसैनिक माझा प्राणवायू आहे, मला कृत्रिम श्वासाची गरज नाही, असे म्हणत शिवसेनाप्रमुखांनी विनाकारण अफवा पसरविण्यांचा आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला आहे. माझी तब्येत जरा खराब आहे, पण ती पूर्णपणे बिघडली असल्याचे अफवा काही प्रसारमाध्यमं करीत आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 12, 2012, 03:08 PM IST

www.24taas.com, मुंबई
लाखो करोडो शिवसैनिक माझा प्राणवायू आहे, मला कृत्रिम श्वासाची गरज नाही, असे म्हणत शिवसेनाप्रमुखांनी विनाकारण अफवा पसरविण्यांचा आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला आहे. माझी तब्येत जरा खराब आहे, पण ती पूर्णपणे बिघडली असल्याचे अफवा काही प्रसारमाध्यमं करीत आहेत.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानामध्ये सोमवारी संपादकीयमध्ये आपली तब्येत चांगली असल्याचे बाळासाहेबांनी लिहिले आहे. माझी तब्येत जरा खराब असल्याचे मी दसरा मेळाव्यातच सांगितले होते. पण मी व्हेटिंलेटरवर आहे, हे साफ खोटं आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेबांची तब्येत जरा खराब आहे. माझ्याकडे या संदर्भात छापण्यासारखेच काहीच नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. माझी तब्येत चांगली करण्यासाठी डॉक्टरांची टीम सतत प्रयत्न करीत आहे. तसेच उद्धव २४ तास माझ्या सेवेत आहे. राजही येऊन जाऊन करीत आहे. त्यामुळे मला कृत्रिम श्वासाची गरज नाही करोडो शिवसैनिकच माझा प्राणवायू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.