बाळासाहेबांना सेनेच्या `सरां`नीही वाहिली आदरांजली!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी हेही शिवतिर्थावर दाखल झाले. जोशी सरांनी जड अंत:करणाने बाळासाहेबांना मानवंदना वाहिली.
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाची जय्यत तयारी
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. शिवाजी पार्कातल्या स्मृतिउद्यानात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरातून लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर दर्शन घेणार आहेत.
शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिउद्यान
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या निधनाला १७ नोव्हेंबरला एक वर्षं पूर्ण होतंय. शिवाजी पार्कवर ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं अत्यंत आकर्षक असं स्मृतिउद्यान तयार करण्यात आलंय.
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराचा खर्च ५ लाख
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारांवेळी पालिकेनं खर्च केलेल्या ५ लाख रुपयांच्या मंजुरीचा प्रस्ताव येत्या स्थायी समिती बैठकीत येणार आहे.
शिवसेनेच्या `पक्षप्रमुख`पदी उद्धव ठाकरेंची निवड...
शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आलीय. शिवसेना कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याचं, पक्षातर्फे सांगण्यात येतंय. तसंच यावेळी युवा सेने ही शिनेसेनेची अंगिकृत संघटना म्हणून जाहीर करण्यात आलंय.
बाळासाहेबांना आदरांजली... आपणही द्या बाळासाहेबांना आदरांजली
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. तर शिवसेनेतर्फेही बाळासाहेबांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरेंची जयंती, सेनेची खास आदरांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती.. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी भारतीय चित्रपट सेनेने एक चित्रफित तयार केली आहे.
बाळासाहेबांवरील पुस्तक `युगान्त`आज होणार प्रकाशन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राऊत यांनी लिहिलेली लेखमाला `युगान्त` या पुस्तकरुपानं प्रकाशित होणार आहे.
बाळासाहेबांचे नाव व्यासपीठाला देऊ नका - पुष्पा भावे
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याला साहित्यवर्तुळातून विरोध होऊ लागला आहे.
बाळासाहेबांचे समाधीस्थळ शिवाजी पार्कातच
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे समाधीस्थळ शिवाजी पार्कातच होणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवाजी पार्कात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मातीचा चौथरा बांधण्याचा निर्णय मनपाच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय.
बाळासाहेबांचे समाधीस्थळ मध्यरात्रीच हटवलं
शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं समाधीस्थळ शिवसैनिकांनी हलवलं.. विधीवत पूजा करुन शिवसैनिकांनी हे समाधीस्थळ हलवत बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा पूर्ववत केली.
चौथरा हटविण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह
गेल्या दोन दिवसात शिवसेना नेत्यांच्या महापालिका आयुक्तांसोबत बैठका झाल्या आहेत. या बैठकीत शिवसेनेनं आपली मागणी आयुक्तांपुढे मांडली मात्र त्यावर शिवसेनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आज बाळासाहेबांच्या महानिर्वाणाला एक महिना पूर्ण होतोय.
शिवसेना आज चौथरा विधीवत हलविणार
बाळासाहेब ठाकरेंवर अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणी बांधण्यात आलेला चौथरा अखेर हलवण्यात येणार आहे. शिवसेना स्वतःच हे बांधकाम काढणार असल्यानं गेले दोन-तीन आठवडे सुरू असलेल्या वादावर पडदा पडणार आहे.
सेनाच हलवणार शिवाजी पार्कवरचा बाळासाहेबांचा चौथरा...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या चौथऱ्याचा वाद अखेर संपुष्टात येणार आहे. लवकरच विधिवत हा चौथरा शिवाजी पार्कवरू हटवण्यात येणार असल्याची भूमिका शिवसेनेनं घेतलीय.
अबु आझमींचा शिवतीर्थ नावाला विरोध
समाजवादी पार्टीने मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कचे नाव बदलण्यास विरोध केला आहे. पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विरोध करताना स्पष्ट केलंय, या मैदानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शिवतीर्थ नाव देणे योग्य नाही.
शिवाजी पार्कचं कायद्यानुसार नामांतर करू - सेना
शिवाजी पार्कचं शिवतीर्थ नामांतर करण्याचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. कायद्यानुसार नामांतर करुच, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं या मुद्यावर विरोधाची भूमिका घेतल्यानं शिवसेना एकाकी पडलीय. तर वरिष्ठ नेते या प्रकरणी निर्णय घेतील अशी भूमिका भाजपनं घेतल्यानं शिवसेनेच्या समस्येत भर पडलीय.
लष्कर घेणार शिवाजी पार्कचा ताबा
दादर येथील शिवाजी पार्कचा वाद चिघळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेत ती जागा सोडण्यास शिवसैनिकांनी नकार दिलाय. तसेच पालिकेत शिवतीर्थ असे नामकरण करण्यावरून जोरदार विरोध झालाय. त्यातच शिवाजी पार्कचा ताबा लष्कर घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
शिवाजी पार्कवरील वीट हलवू देणार नाही - राऊत
मुंबईतील शिवाजी पार्क हे आमच्यासाठी शक्तिस्थळ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावरील अंत्यसंस्काराची जागा ही तमाम शिवसैनिक आणि शिवप्रेमींसाठी शक्तिस्थळच आहे. येथील एकही वीट हलवू देणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
‘बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही’
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही, असा शिवसेनेने सरकारला इशारा दिलाय. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या जागेचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
शिवाजी पार्क जागा : संजय राऊत यांना नोटीस
शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराची जागा तातडीनं सोडण्याची नोटीस महापालिकेनं बजावलीय. आता शिवेसना ही जागा सोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.