स्मारकासाठी कायदाही हातात घ्या - मनोहर जोशी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्कातच व्हावं..अशा प्रसंगी कायदा विरोधात असेल तर कायदा हातात घेण्याचं आवाहन शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलंय.

Updated: Nov 27, 2012, 10:38 AM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्कातच व्हावं..अशा प्रसंगी कायदा विरोधात असेल तर कायदा हातात घेण्याचं आवाहन शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलंय. इतर प्रश्न ज्याप्रमाणे शिवसेना हाताळते, तशाच प्रकारे शिवसेना स्टाईलनं हा प्रश्न हाताळला जाईल. असंही ते म्हणाले.
शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मारकास मराठी माणूसच विरोध करत असल्याचं दु:ख होत असल्याचं आणि त्याची चीडही येत असल्याचं सांगत त्यांनी मनसेलाही टोला हाणलाय. ते नाशिकमध्ये बोलत होते.
कायदा हातात घेण्याची भाषा करुन त्यांनी सरकारला आणि विशेष करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांबरोबरच मनोहर जोशींसारख्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यानंच कायदा हातात घेण्याचे आवाहन केल्यामुळं बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे.