उद्धव-राजनं शिवसैनिकांना केलं शांततेचं आवाहन

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर आहे. ते सध्या लाईफ सपोर्ट सिस्टिमवर आहेत. परिस्थितीचं गांभीर्य राखून शिवसैनिकांनी शांतता राखावी’ असं आवाहन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मातोश्रीच्या गेटवर येऊन केलंय.

Updated: Nov 15, 2012, 07:14 AM IST

www.24taas.com,मुंबई
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर आहे. ते सध्या लाईफ सपोर्ट सिस्टिमवर आहेत. परिस्थितीचं गांभीर्य राखून शिवसैनिकांनी शांतता राखावी’ असं आवाहन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मातोश्रीच्या गेटवर येऊन केलंय. तर, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय.
सध्या, मातोश्रीवर झालेली गर्दी खूप काही सांगून जातेय. शिवसैनिक आणि बाळासाहेबांचं घट्टं नातं इथं स्पष्टपणे दिसून येतंय. हजारो शिवसैनिकांसोबतच सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, रामदास आठवले हेही मातोश्रीवर दाखल झालेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक झाली असून बाळासाहेबांवर `मातोश्री`वर उपचार सुरु आहेत.
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, संजय दत्त, मान्यता दत्त हेही मातोश्रीवर उपस्थित झालेत. बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता असल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले आहेत. त्यामुळे मातोश्री बाहेर पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत बिघडली आहे. मातोश्रीवरच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉ. जलाल पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा चमू बाळासाहेबांवर उपचार करत आहेत. बाळासाहेबांचे चिरंजीव आणि शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत.