www.24taas.com, मुंबई
यंत्र म्हणजे विशिष्ट ईश्वरी शक्तीचा आविष्कार प्राप्त करण्याचे साधन. धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी श्रीयंत्र, महालक्ष्मी, लक्ष्मीगणेश, श्रीसुक्त यंत्र तसेच दुष्ट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी महामृत्युंजय यंत्र, रामरक्षा यंत्र, दत्तात्रय यंत्र या यंत्रांची विधीवत पूजा केल्यास त्याचे निश्चित असे फळ मिळते. यंत्रामध्ये विशिष्ट प्रकारच्य रेषा,त्रिकोण,वर्तुळे,पुष्पदल,बीजाक्षरे,बीजमंत्रांच्या विविध रचना असतात. यंत्र घडविण्यासाठी लागणारे साहित्य, घडविण्याची पद्धत, वेळेचे पावित्र्य, शुद्धीकरण, प्राणप्रतिष्ठा आणि सिद्धिकरण या सर्व महत्वपूर्ण गोष्टी आहेत.
त्यामुळे बाजारातून किंवा तीर्थक्षेत्र स्थानातून यंत्र आणून देवघरात ठेवण्या अगोदर तज्ञांची मदत अथवा सल्ला घेणे आवश्यक आहे. यंत्राची शास्रोक्तरीत्या प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय त्याच्या शक्तीचा पूर्ण आविष्कार प्राप्त होऊ शकत नाही. महत्वाची सूचना - यंत्राची रोज पूजा अर्चा करणे आवश्यक आहे कमीतकमी दिवा-अगरबत्ती ओवाळणे आवश्यक आहे.
वेळेची उपलब्धता व आवडीनूसार रोज यंत्राचे पूजनअर्चन,षोडषोपचार किंवा पंचोपचार पूजा,अभिषेक आराधना मंत्रोच्चारण,जप आराधना,बीज मंत्र उपासना,होम यज्ञात्मक उपासना अशा प्रकारे चढत्या क्रमाने आराधन पद्धती त्याअनुसरुन फलप्राप्ती यंत्राच्या माध्यमातून होत असते.