तुमचं भाग्य उजळण्यासाठी बांबूचे रोप....

फेंग शुईमध्ये दीर्यायुष्यासाठी बांबूची रोपे खूपच शक्तिशाली मानली जातात. बांबू हे प्रतिकूल परिस्थितीतही भरपूर वृद्धीचे प्रतिनिधित्व करतात.

Updated: May 3, 2013, 11:21 AM IST

www.24taas.com
फेंग शुईमध्ये दीर्यायुष्यासाठी बांबूची रोपे खूपच शक्तिशाली मानली जातात. बांबू हे प्रतिकूल परिस्थितीतही भरपूर वृद्धीचे प्रतिनिधित्व करतात. तसेच कोणत्याही वादळी हवामानाचा सामना करण्याचे सामर्थ्य असल्याचे बांबू हे प्रतीक आहे.
बांबूचे रोपटे दीर्घायुष्याचे आणि उत्तम प्रकृतिस्वास्थ्याचे प्रतीक आहे. हे आपल्या सद्भाग्याचेही प्रतीक आहे. त्यामुळे आपण आपल्या कार्यायलात किंवा घरात बांबूच्या रोपांचे चित्र लावून आपले भाग्य शक्तिशाली बनवू शकता. आपण आपल्या किरकोळ विक्रीच्या दुकानात बांबूचा तुकडा टांगून, दुकानाचे उत्तम रक्षण निर्माण करू शकता. त्यामुळरे आपला व्यवसाय प्रतीकात्मक रीतीने बांबूच्या रोपांप्रमाणे संकटकाळातही स्थिर राहील आणि अनुकूल वेळ आपल्यावर भरभराटीस येऊन समृद्ध होईल.
आपण बांबूच्या तुकड्यांची एक जोडी लाल धाग्याने बांधून, आपल्या दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या समोरच्या भिंतीवर टांगून ठेवू शकता. या बांबूच्या तुकड्यांच्या दोन्ही बाजू उघड्या असायला हव्यात आणि या तुकड्याची लांबी सहा ते आठ इंचांच्या दरम्यान असली पाहिजे.