९ दिवस नवरात्रीच्या व्रतासाठी या बाबी लक्षात ठेवा

१३ ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रौत्सव सुरू होतोय. अनेक भाविक नवरात्रीच्या नऊही दिवशी व्रत ठेवतात. व्रत सुरू करण्यासाठी ते कशाप्रकारे ठेवावं? फलाहार करायचाय की दूध किंवा ज्यूस पिऊन उपवास करायचाय. 

Updated: Oct 7, 2015, 03:32 PM IST
९ दिवस नवरात्रीच्या व्रतासाठी या बाबी लक्षात ठेवा title=

मुंबई: १३ ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रौत्सव सुरू होतोय. अनेक भाविक नवरात्रीच्या नऊही दिवशी व्रत ठेवतात. व्रत सुरू करण्यासाठी ते कशाप्रकारे ठेवावं? फलाहार करायचाय की दूध किंवा ज्यूस पिऊन उपवास करायचाय. 

यावेळी शरीराचं डिटॉक्सिफाय होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर निघतील. न्यूट्रीशियन आणि डाएट एक्सपर्ट दीपा शर्मा यांच्या मते पावसाळ्यात पित्त वाढतं, पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळं उपवासानं पित्त कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते. जर आपण ९ दिवस व्रत/उपवास ठेवणार असाल तर या नऊ गोष्टी लक्षात ठेवा...

आणखी वाचा - अचानक धन पाहिजे तर लक्ष्मीच्या १८ पूत्रांचे नाव घ्या

नवरात्रौत्सवात व्रतातील आहार कसा असावा?
- हाय फायबर आणि लो फॅट असणारे पदार्थ खावे
- मॉर्डरेट प्रोटीन, हाय कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खा
- त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी आहारातील द्रव पदार्थ वाढवा
- सामान्य दूधाऐवजी स्किम्ड दूध प्या

नवरात्रौत्सवात व्रतादरम्यान किती कॅलरीची असते गरज?
- नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये १८००-२२०० कॅलरीची व्रतासाठी गरज 

नवरात्रीच्या व्रतात काय करू नये?
- फक्त लिंबू-पाणी पिऊन उपवास ठेवू नये.
- खाहीही न खाता नुसतं दूध पिऊन उपवास करू नका, असं केल्यानं अशक्तपणा येतो.
- यामुळं थकवा, ब्लड प्रेशर लो आणि चिडचिडपणा वाढू शकतो.
- गॅस्ट्राइटिस, अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते.
- व्रतात आंबट फळं उदा. संत्री, लिंबू, मोसंबी खाऊ नये.
- व्रतादरम्यान लंच आणि डिनरमध्ये आहाराचं संतुलन राखावं.
- कुटू किंवा शिंगाड्याच्या पिठाची चपाती खावी.
- साबुदान्याची खीर किंवा खिचडी खाऊ शकता.
- सीताफळ, बटाट्याची रस्सेदार भाजी खाणं चांगलं राहील.
- दिवसातून तीन वेळी फळं किंवा फ्रूट सॅलेड खावं.
- ४-६ वेळा सुख्यामेव्यासह ज्यूस, दूध, मिल्कशेक पिणं चांगलं राहील.
- नारळ पाणी आपल्या डाएटमध्ये अवश्य असू द्या
- नवरात्रीच्या व्रतात कमीतकमी ८ लीटर पाणी प्यावं.
- एकाच प्रकारच्या फळांपेक्षा मिक्स्ड फळं खावीत.
- ताजी फळं खा, कडवट चवीचे फळं खाऊ नका.

 

आणखी वाचा - पैसा - स्वास्थ्य मिळवण्यासाठी महालक्ष्मीचं व्रत!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.