दिव्या दिव्या दिपोत्कार.... चला करूया दीपपूजन

ज्याप्रमाणे दिवा अंधाराचा नाश करतो, त्याप्रमाणे दोष आणि अहं... यांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न वाढवून आंतरिक मन:शांती मिळते.

Updated: Nov 6, 2012, 08:15 AM IST

www.24taas.com, मुंबई
ज्याप्रमाणे दिवा अंधाराचा नाश करतो, त्याप्रमाणे दोष आणि अहं
यांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न वाढवून आंतरिक मन:शांती मिळते.
दिवा अंधाराचा नाश करतो. मित्रांनो, आपल्या जीवनात कोणता अंधार आहे ? दोष आणि अहं यांमुळे आपण दुःखी आहोत. दिवा हे आनंदाचे प्रतीक आहे. आपण दोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न केल्यास आंतरिक मन:शांती मिळते.
अहंचे आवरण गेल्यावरच आनंद मिळतो. ‘मी बुद्धीमान असून मला कळते, इतरांना काही येत नाही’, ही अहंची लक्षणे आहेत. त्यापेक्षा ‘देव सर्व करतो. तोच आपल्यात राहून प्रत्येक कृती करतो, हे मान्य करायला हवे. ‘देवाविना आपण काहीच करू शकत नाही’, असा विचार सतत केल्यासच आपण आनंदी होऊ.
‘हे श्रीकृष्णा, तुला अपेक्षित असा दिवाळी हा सण आम्हाला साजरा करता येऊ दे, तसेच दिवाळीतील सर्व अपप्रकार नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच आम्हाला दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’