मुंबई : गुढीपाडव्याला म्हणजेच ८ एप्रिलला चैत्र महिन्यातील नवरात्रीला सुरुवात होईल. या दिवसांमध्ये देवीचं पूजन आणि नवरात्रीच्या व्रताचं महत्त्व आहे. या दिवसांत व्रत केले जाते. मात्र, या शुभ दिवशी या काही गोष्टी तुम्ही विसरु नका.
या गोष्टी ध्यानात ठेवा
- नवरात्रीचे व्रत ठेवणाऱ्या पुरुषांनी या नऊ दिवसांत आपली दाढी, मिशी अथवा केस कापू नये. पण, या दिवसांत आपल्या मुलाचे मुंडन करणे शुभ मानले जाते.
- नऊ दिवस नख कापणेसुद्धा वर्ज्य मानले जाते.
- तुम्ही जर घरी कलश स्थापना करणार असाल किंवा देवीच्या कोणत्याही समारंभाचे आयोजन करणार असाल तर घर बंद करुन कुठेही जाऊ नका.
- व्रत ठेवण्याच्या दिवसांदरम्यान काळे कपडे परिधान करू नका.
- व्रत ठेवणार असाल तर या दिवसांत चामड्याचे बूट, चपला किंवा पट्टे वापरू नका. एकूणच चामड्याच्या कोणत्याही वस्तू वापरू नका.
- विष्णूपुराणानुसार नवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसा झोपल्या, तंबाखू खाल्ल्यास किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यास व्रताचे फळ मिळत नाही.