मुंबई : असं म्हणतात की आपले भविष्य आपल्या हातात असते. हातावरच्या रेषा आपला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाबाबत बरंच काही सांगतात. तळव्यावरील हार्ट लाईन एकत्र केल्यास हातावर अर्धा चंद्र दिसतो. तर काहींच्या या रेषा जुळत नाहीत.
अशा व्यक्ती फार आकर्षक स्वभावाच्या असतात. अशा व्यक्ती बालपणीचा मित्र/ मैत्रिणीशी अथवा फॉरेनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींसोबत सेटल होतात. या व्यक्ती जाहीरपणे आपले प्रेम व्यक्त करु शकत नाहीत. हुशार असतात. कठीण काळाचाही खंबीरपणे सामना करतात. निडरपणे कोणत्याचे कामाचे नेतृत्व करतात.
अशा व्यक्तींना परिपक्व व्यक्तींची साथ आवडते. तसेच अशा व्यक्तींना समाज आपल्याबद्दल काय विचार करतो याने काही फरक पडत नाही.