पाहा नवरात्रीचे ९ शुभ मुहूर्त, ९ दिवसात भाग्योदय

१३ ऑक्टोबरपासून सुरू नवरात्रौत्सवाचे ९ शुभ मुहूर्त आहेत. या नऊ दिवसांमध्ये ग्रह आणि नक्षत्रांचा असा शुभ संयोग आहे ज्यामुळं तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. 

Updated: Oct 12, 2015, 04:50 PM IST
पाहा नवरात्रीचे ९ शुभ मुहूर्त, ९ दिवसात भाग्योदय title=

मुंबई: १३ ऑक्टोबरपासून सुरू नवरात्रौत्सवाचे ९ शुभ मुहूर्त आहेत. या नऊ दिवसांमध्ये ग्रह आणि नक्षत्रांचा असा शुभ संयोग आहे ज्यामुळं तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. 

हे नऊ नक्षत्र व्यवसाय, नोकरी, प्रमोशन, लग्नासाठी खूप शुभ आहे. वस्त्र, दागिनी, घर आणि जमीन खरेदी केल्यास भविष्यात अप्रत्यक्ष यश आपल्याला मिळू शकते. १३ ऑक्टोबरपासून २२ ऑक्टोबरपर्यंत ९ शुभ मुहूर्त अशाप्रकारे आहेत -

आणखी वाचा - ९ दिवस नवरात्रीच्या व्रतासाठी या बाबी लक्षात ठेवा

यंदा नवमी आणि दशमी एकाच दिवशी आहे म्हणजे २२ ऑक्टोबरला सकाळी ११.५८ पर्यंत नवमी असून त्यानंतर दशमी लागणार आहे.

१३ ऑक्टोबरला घटस्थापना
- माँ शैलपुत्रीची आराधना करा
- प्रतिपदा तिथीमध्ये घटाची स्थापना
- अभिजीत मुहूर्त- सकाळी ११.४४ ते दुपारी १२.३० 
- चित्रा नक्षत्रात पार्टनरशिपमध्ये फायदा मिळेल
- विश्वकर्मा पूजनानं व्यवसायात लाभ मिळेल.

१४ ऑक्टोबर नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस 
- माँ शैलपुत्रीची आराधना करावी
- प्रतिपदा तिथीत वाढ
- स्वाती नक्षत्रात मंगलकार्य करावेत
- शेतकऱ्यांनी शेतीशी निगडित कामं सुरू करावी

१५ ऑक्टोबर दुसरा दिवस
- माँ ब्रम्हचारिणीची आराधना
- विशाखा नक्षत्रात दुसऱ्याची मदत केल्यास फायदा
- वाहन खरेदीसाठी शुभ दिवस
- नवीन कपडे आणि दागिनी घातल्यास प्रसन्नता

१६ ऑक्टोबर तिसरा दिवस
- माँ चंद्रघंटाची उपासना
- रवी आणि सर्वार्थ सिद्ध योग सकाळी ९.४४ पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२७ वाजेपर्यंत
- नववधूच्या हातानं स्वयंपाक घरात सुरूवात करा, शुभ मुहूर्त
- रवी आणि सर्वार्थ सिद्धयोगात सुरू केलेल्या कामांमध्ये यश मिळेल.

१७ ऑक्टोबर चौथा दिवस
- माँ कूष्मांडाची उपासना करा
- रवी योग सकाळी ६.२७ ते ११.४३
- १७ ऑक्टोबरला अनुराधा नक्षत्रात मंगलकार्य करू शकता.
- १७ ऑक्टोबरला कर्ज घेऊ नका ते परत करण्यास संकटं येतील.

१८ ऑक्टोबर पाचवा दिवस
- स्कंदमाताची उपासना
- रवी आणि सर्वार्थ सिद्ध योग दुपारी ०१.१३ पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२८ पर्यंत..
- इंटरव्यूमध्ये यश मिळेल
- फॅक्ट्री सुरू करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.

१९ ऑक्टोबर सहावा दिवस
- माँ कात्यायनीची उपासना करावी
- रवी योग सकाळी ६.२८ ते दुपारी २.११ पर्यंत
- १९ ऑक्टोबरला कर्ज घेण्यापासून बचाव करा आणि खूप गरजेचं असेल तर प्रवास करा.

२० ऑक्टोबर सातवा दिवस
- माँ कालरात्रीची उपासना करावी
- पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये खोदकाम केल्यानं गाडलेलं धन मिळेल.
- मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त

२१ ऑक्टोबर अष्टमी  
- माँ महागौरीची उपासना करावी
- रवी योग दुपारी २.२० मिनीटांपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजेपर्यंत आहे.
- रवी योगात शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होईल.
- २१ ऑक्टोबरला खरेदी केलेल्या वस्तूंचा भविष्यात फायदा होईल.
- नवीन कपडे, दागिने घालण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.

२२ ऑक्टोबर नवमी आणि दशमी 
- माँ सिद्धिदात्रीची उपासना करावी.
- सकाळी ११.५८ पर्यंत नवमी तिथी आहे. 
- २२ ऑक्टोबरला रवी योग सकाळी ६.३० पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० पर्यंत आहे.
- सकाळी ११.५८ नंतर दशमी तिथी सुरू होईल.
- श्रवण नक्षत्रात प्रवास केल्यानं फायदा होईल. 

आणखी वाचा - अचानक धन पाहिजे तर लक्ष्मीच्या १८ पूत्रांचे नाव घ्या

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.