शुक्रवारी करा हे उपाय दारिद्रय होईल दूर

हिंदू पंचागानुसार शुक्रवारचा दिवस महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणजेच धन-धान्य देवीची पूजा. यामुळे महालक्ष्मीची कृपादृष्टी राहण्यासाठी या दिवसाच्या पुजेचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरातील दारिद्र्य दूर होते. 

Updated: Jun 24, 2016, 08:15 AM IST
शुक्रवारी करा हे उपाय दारिद्रय होईल दूर title=

मुंबई : हिंदू पंचागानुसार शुक्रवारचा दिवस महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणजेच धन-धान्य देवीची पूजा. यामुळे महालक्ष्मीची कृपादृष्टी राहण्यासाठी या दिवसाच्या पुजेचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरातील दारिद्र्य दूर होते. 

1. जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरात नेहमी स्वच्छता ठेवा यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. 

2. संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारु नका. यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते. 

3. दर शुक्रवारी गोमातेला पोळी खायला द्या. यामुळे महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. 

4. या दिवशी गरीब अथवा गरजू व्यक्तीला तांदूळ, सफेद रंगाचे कपडे अशा वस्तू दान करा. यामुळे मातेचा वरदहस्त तुमच्यावर राहील. 

5. घरात चांगले वातावरण कसे राहील याकडे नेहमी लक्ष द्या. घरात तणावाचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.