IND VS BAN 1st Test Match 3rd Day : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज पार पडणार असून यातील पहिला सामना हा चेन्नईत सुरु आहे. चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्याचा शनिवारी तिसरा दिवस होता. या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी 500 हुन अधिक धावांचे आव्हान दिले. यावेळी भारताची गोलंदाजी सुरु असताना यशस्वीने अफलातून कॅच पकडून टीम इंडियासाठी धोकादायक बनत असलेल्या बांग्लादेशच्या सलामी जोडीची पार्टनरशिप तोडली.
भारताने विजयासाठी मोठं आव्हान दिल्यावर ते पूर्ण करण्याकरता बांगलादेशकडून झाकीर हसन आणि शादमान इस्लाम या सलामी फलंदाजांची जोडी मैदानात उतरली. या दोघांनी जवळपास 62 धावांची पार्टनशीप केली. दोघेही मैदानात जम बसवत होते तर टीम इंडियाच्या गोलंदाजांना त्यांना बाद करणे शक्य होत नव्हते. 15 ओव्हरपर्यंत बांगलादेशची एकही विकेट काढण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले नाही. अखेर 17 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर बुमराहने टाकलेल्या बॉलवर झाकीर हसनने शॉट खेळला. मात्र मैदानात फिल्डिंग करत असलेल्या यशस्वी जयस्वालने चपळाई दाखवून झाकीरची कॅच पकडली, त्यामुळे भारताला बांगलादेशची पहिली विकेट मिळाली. सध्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा : ऋषभ पंतने लगावली कमबॅक सेंच्युरी, पण मैदानात उतरण्यापूर्वी बॅट सोबत नेमकं काय केलं? Video आला समोर
Jasprit Bumrah with the first breakthrough as Yashasvi Jaiswal takes a brilliant catch to dismiss Zakir Hasan.
Watch
Live - https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/KdWyAW1yIN
— BCCI (@BCCI) September 21, 2024
भारताचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जयस्वालयाने बांगलादेश विरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना अर्धशतक ठोकले. रोहित, गिल आणि विराट सारखे स्टार फलंदाजांनी लागोपाठ विकेट गमावल्यावर यशस्वी मैदानात टिकून राहिला. त्याने 56 धावा केल्या या दरम्यान 9 चौकार लगावले. परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये तो समाधानकारक धावा बनवू शकला नाही. बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना तो केवळ 10 धावा करू शकला.