मुंबई : संख्याशास्त्रानुसार वाहनाचा क्रमांक कोणत्याही व्यक्तीसाठी फार महत्त्वाचा असतो. वाहनाचा क्रमांक वाहन मालकासाठी लकी असेल त्याच्या वाहनाचे आयुर्मानही चांगले राहते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने वाहन खरेदी करताना आपल्या वाहन क्रमांकाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कारण, अनलकी क्रमांक असेल वाहनाचा अपघात होणे, वाहन खराब होणे अशा घटना घडू शकतात. म्हणून वाहन नव्याने घेत असाल किंवा सेकंड हॅन्ड असल्यास त्याच्या क्रमांकावर लक्ष द्या.
एक
ज्यांच्या जन्मतारखेचा मूलांक (जन्मतारखेची एक अंकी बेरीज) एक असल्यास म्हणजेच तुमचा जन्म १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला असल्यास १ किंवा ९ मूलांक (वाहनाच्या क्रमांकाची एक अंकी बेरीज) असलेला क्रमांक गाडीसाठी घ्या. ४ किंवा ८ मूलांक तुमच्यासाठी चांगला नाही.
दोन
ज्यांचा जन्म २, ११, २० किंवा २९ तारखेला झाला आहे त्यांच्यासाठी २ हाच मूलांक लकी असू शकतो.
तीन
ज्यांचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झालाय त्यांच्या वाहनासाठी ३, ६ किंवा ९ मूलांकाचं वाहन लकी असतं.
चार
ज्याचा जन्म ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झालाय म्हणजेच ज्यांच्या मूलांक ४ आहे त्यांच्यासाठी १ किंवा ४ मूलांक लकी ठरू शकतो. मूलांक ९ तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो.
पाच
ज्यांचा जन्म ५, १४ किंवा २३ तारखेला झालाय म्हणजेच ज्यांचा मूल्यांक ५ आहे त्यांच्या गाडीचा मूलांक ५ किंवा ८ असावा. मूलांक ९ किंवा २ तुमच्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण करू शकतो.
सहा
तुमची जन्मदिनांक ६, १५ किंवा २४ असेल तर तुमचा मूलांक ६ असतो. अशा व्यक्तींनी ६ किंवा ९ मूलांक असलेलं वाहन खरेदी करावं. १ किंवा ५ मूलांक असलेलं वाहन तुम्हाला पूर्णपणे लाभदायी ठरणार नाही.
सात
ज्यांची जन्मदिनांक ७, १६ किंवा १५ असल्यास तुमचा मूलांक ७ असतो. अशा व्यक्तींसाठी ७ किंवा २ मूलांकाचे वाहन लकी ठरते. १ किंवा ९ मूलांक असलेले वाहन तुमच्यासाठी लकी ठरणार नाही.
आठ
तुम्ही ८, १७ किंवा २६ तारखेला जन्मले असाल म्हणजेच तुमचा मूलांक ८ असेल तर तुमच्या वाहनाचा मूलांक ४ किंवा ८ असू द्या. वाहनाचा मूलांक १ असल्यास वाहन वारंवार बिघडू शकतं.
नऊ
तुमचा जन्मदिनांक ९, १८ किंवा २७ असेल तर तुमच्या वाहनाचा मूलांक ९ किंवा १ असावा. तुम्हाला अशा वाहनापासून दीर्घकाळ सुख मिळू शकतं. पण, वाहनाचा मूलांक ४ नसेल याची काळजी घ्या.