शुभकार्यात काळे वस्त्र अशुभ आहे का?

आपल्याकडे धार्मिकतेला खूपच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे काय शुभ आणि काय अशुभ याबाबत चर्चा होताना दिसते. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही शुभकार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत, असे सांगितले जाते. त्यामुळे काळा रंग हा अशुभ मानला जात आहे.

Updated: Apr 27, 2012, 12:17 PM IST

www.24taas.com,मुंबई

आपल्याकडे धार्मिकतेला खूपच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे काय शुभ आणि काय अशुभ याबाबत चर्चा होताना दिसते. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही शुभकार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत, असे सांगितले जाते. त्यामुळे काळा रंग हा अशुभ मानला जात आहे.

काळा रंग हा अशुभ मानला जात असल्याने शुभ कार्यात याला स्थान नसल्याचे दिसते. त्यामुळे घरात होणार्‍या शुभकार्यात काळे वस्त्र परिधान करीत नाही. असा समज आहे. तर काही  अनेक लोक हा केवळ अंधविश्वास आहे, असे समजून त्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे आधुनिकतेच्या नावावर खापर फोडले जाते. काळ्या रंगाच्या प्रेमात असणारे काही कट्टर लोक  लग्नकार्यामध्ये नवरा-मुलहीसह अनेकजण काळ्या रंगाचे कपडे घालण्यालाच प्राधान्य देतात.

ज्योतिष शास्त्रानुसार  शुभकार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत, असे सांगितले गेल्याने  लग्नकार्याच्यावेळीही लाल, पिवळ्या किंवा गुलाबी रंगांच्या कपड्यांना जास्त प्राधान्य दिले जाते. लाल रंग हा ऊर्जेचा स्रोत आहे. त्याचबरोबर हा रंग सकारात्मक ऊर्जेचेही प्रतीक आहे. निळ्या, काळ्या रंगाच्या कपड्यांना शुभ कार्याच्यावेळी विरोध करण्यालाही शास्त्रीय कारण आहे.

काळा रंग हा  निराशेचे प्रतीक मानले गेले आहे. जर पहिल्यांदाच कोणताही नकारात्मक विचार मनात आला, तर त्याआधारावर तुमचे नवे नाते मजबूत होण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे लग्नकार्यात नवरा आणि नवरी दोघांनीही काळे कपडे परिधान करू नये, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे.