एका कट्टर मुंबईकराचा सवाल

महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांचा प्रचार सुरु झालाय. यामध्ये मी निरीक्षण केलेल्या गोष्टींबाबत लिहीतोय...

Updated: Jan 27, 2017, 09:32 PM IST
 एका कट्टर मुंबईकराचा सवाल  title=

नमस्कार, मी प्रशांत सोनार एक मुंबईकर....महापालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांचा प्रचार सुरु झालाय. यामध्ये मी निरीक्षण केलेल्या गोष्टींबाबत लिहीतोय...कृपया आपल्यातील पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून वाचा...ना की कुठल्या पक्षाचे भक्त, नेते-कार्यकर्ते आहात हा दृष्टीकोन काही क्षण बाजूला ठेवा ही विनंती...स्वत:शी प्रामाणिक राहून हे वाचा एवढं मात्र नक्की...

मुंबईमध्ये तुम्ही किती वर्षे राहता तुम्ही राहता त्याठिकाणी तुम्हाला वीज मिळते का हो किती रुपये दराने?
तुम्हाला पाणी पुरेसं मिळतं का ? त्यातही पिण्यायोग्य त्या पाण्याचा १०० लिटरमागे दर किती आहे याची कल्पना तुम्हाला आहे का ?  एक लिटर बिसलेरी मागे तुम्ही किती रुपये मोजता? महाराष्ट्रात दुष्काळ सुरू असतांना तुम्हाला मुंबईत मुबलक पाणी मिळत होतं का? कदाचित एक-दोन दिवसाआड मिळत असेल आपल्याला हे पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी कोणाची हे तुम्हाला निश्चितच माहित असेल? तुमच्या राहत्या विभागात रस्ते आहेत का? ते कुणाच्या अखत्यारित आहेत ह्याची कल्पना तुम्हाला असेलच ? त्या रस्त्यांना खड्डे असतीलच मग एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही संबंधित यंत्रणेला, प्रशासनाला किती वेळा लेखी कळवलं, लेखी तक्रार केली का कितीवेळा ? फेरफटका मारण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी तुम्ही बाग-बगिच्यात जात असाल ना ते सुस्थितीत आहेत का?

वरील प्रश्नांना तुमची उत्तरे तुम्हालाच समाधान देत असतील तर पुढील लेख वाचा....
आता वळुयात भाजपकडे....भाजपचं यावेळी लक्ष्य आहे ते मुंबई महापालिकेतील पारदर्शकता आणि मुंबई शहराचा विकास....वरील विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं असतील तर मग तो विकास नाही का?  ह्याला विकास समजायचं नाही का? या विकासामध्ये भाजपचा काहीच सहभाग नव्हता का? असो, मुंबई सारख्या शहरात मोनो, मेट्रोसारख्या सुविधा असायलाच हव्यात पण विकास करतांना जुन्या सेवांकडे दुर्लक्षकरुन कसं चालेल? मग शहरातील बेस्ट सेवा असो, इतर सार्वजनिक वाहतूक सेवा असो ह्याची जबाबदारी काय फक्त सहयोगी पक्षावर टाकून चालतं का हो? बरं त्यात आमची सत्ता नाही असं म्हंटलं तर काम संपल असं कसं मानायचं? एकीकडे मेट्रोसाठी हरित पट्टा उद्वस्त होतोय ही ओरड विरोधक करतायत पण ते पूर्णपणे खोटं आहे असं समजायचं का? विकास म्हणजे ५०-६० वर्षे सावली देणा-या झाडांची कत्तल करुन त्याऐवजी ४-५ शोभेची झाडं लावणं म्हणजे पर्यावरणाचं समतोल राखणं असं होतं का? चौपाटीवरची वाळू नष्ट होतेय त्याची काळजी घ्यायची की फक्त चौपाटीचं सुशोभिकरण म्हणजे विकास? किल्ल्यांची पडझड थांबवायची, त्यावरील अनधिकृत बांधकाम, गोष्टी दूर सारायच्या की नवीन स्मारकांची राजकिय घोषणा करायची म्हणजे विकास? राहिला मुद्दा पारर्दशकतेचा आजपर्यंत सगळा कारभार अपारदर्शक होता असं मानायचं का? तो अपारदर्शक होता तर सत्तेतून भाजप का नाही बाहेर पडला? पारदर्शकतेची जबाबदारी कोण्या एका पक्षाला का दिली जात नाही हा प्रश्न मी विचारणार नाही कारण पक्षातून ती जबाबदारी कोणाला तरी दिली असेलच ना? असो जनता ठरवेलच... पण जनतेने भाजपचा पारदर्शकतेचा मुद्दा नाकारला तर भाजप पारदर्शकतेने पराभव मान्य करेल का हा खरा सवाल? 

   आता वळूयात शिवसेनेकडे...करुन दाखवलं असं सांगायची वेळच शिवसेनेवर का आली हा विचार आधी सेनेनं करावा? कदाचित तो केला असेलच? तुमचा पक्ष सार्वजनिक क्षेत्रात वावरतोना मग लोकांना कळतं ना तुम्ही काम करता की नाही करत. ? मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे का शिवसेना स्टाईलने बुजविले नाही हा माझ्यासारख्या सामान्य मुंबईकराला पडलेला प्रश्न. शिवसेनेला संबंधित कंत्राटदारांना शिवसेना स्टाईलने जाब का विचारता आला नाही? विचारला असल्यास तो जाहिर का केला जात नाही? शिवसेनेचं बळ कमी पडलं की पक्षाचे हातही दगडाखाली होते? सरकारच्या चांगल्या कामाचं कौतुक आणि चुकीच्या कामांसाठी जाब विचारु असं म्हणणारे पक्षप्रमुख आपल्या मंत्र्यांना राजीनामे द्या असे आदेश का देत नाहीत? का आदेश मंत्री मानत नाहीत? पारदर्शक नसल्याचा डाग मित्रपक्ष देत असतांना राजनाम्याची पारदर्शकता शिवसेनेकडून का दाखवली जात नाही? कुठेतरी सत्ता ही शिवसेनेची दुर्बलता ठरतेय का? मराठी माणसासाठी शिववडा तयार करणारी सेना फक्त वडापाववरच थांबलीय का? शहरातून बाहेर पडावं लागणा-या मराठी माणसासाठी शिवसेनेनं काय ठोस केलं?/ काय करुन दाखवलं हे एकदा तरी सांगावं कारण WE DON’T KNOW ? कारण मराठी माणूस हाच तुमचा पहिला मतदार मग तुम्ही तो या आपल्या मुंबईत टिकवला का? 

असो मला राजकारण कळत नाही....पण असे प्रश्न नक्की पडतात कारण विकासाला काही मुद्दयांमुळे विरोध करणारे उद्या त्याच मोनो-मेट्रोनं प्रवास करतील...तर पेंग्विनला दर्शनाला विरोध करणारे उद्या आपल्याच घरातील मुलांना ते पेग्विनच दाखवायला नेतील....

तुर्तास एवढंच पण पुन्हा एकदा विनंती वाचा विचार करा मग प्रतिक्रिया द्या....कोणी दुखावलं गेलं असल्यास क्षमस्व....

प्रशांत सोनार, 
एक कट्टर मुंबईकर