सिवसेना की शाका!

एकेकाळी सेनेच्या वाघानं आवाज जरी दिला तरी अख्खी मुंबई ठप्प व्हायची..सेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे सेना असं चित्र होत. आताही तसं चित्र आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात वेगळं आहे. शाखा म्हणजे सेनेचा कणा. 

Updated: Jun 7, 2016, 10:17 PM IST
सिवसेना की शाका! title=

सुनील काळे, झी २४तास, मुंबई : एकेकाळी सेनेच्या वाघानं आवाज जरी दिला तरी अख्खी मुंबई ठप्प व्हायची..सेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे सेना असं चित्र होत. आताही तसं चित्र आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात वेगळं आहे. शाखा म्हणजे सेनेचा कणा. 

त्याच बळावर सेनेची ताकद असते. पण ग्लोबालायजेशनच्या युगात शाखाही अपवाद नाही. आधी शाखेला प्रसिद्धीची गरज नसयाची पण आता उद्घाटनाला पीआर एजन्सी हायर केली असावी बहुधा..सेनेच्या या हायटेक (अमराठी ) पीआरशी झालेला संवाद खूप काही सांगतो. एक सिंह नावाचा माणूस फोन करुन मला, "सिवसेना की शाका का प्रॉग्रैम है, कव्हर करेंगे क्या" मग संवाद सुरु होतो

मी- किधर है ये कार्यक्रम

तो-देखो भैया ये तो ये अपना साकीनाका है ना उधर है

मी- कौन करनेवाला है

तो-देखो वो कोई रामदास कामत कर के है वो करनेवाले है

मी-कौन रामदास कामत

तो-देखो अरे वो सिवसेना कुछ मिनीस्टर है, एक सेकंद वो क्या मिनीस्टर है ( काहीतरी पेपर त्याने हातात घेतला असावा ) हाँ वो ना कुछ पर्यावरण का मिनीस्टर है

मी-देखता हूँ

तो-देखो नही सर करो ना. अच्छी शाका बननेवाली है. बडा ऑफीस बनाया है. 

त्याला काय पीआर म्हणून सेना एखादी कंपनीसारखी वाटली असेल. बडा ऑफीस, बडी शाका म्हणजे म्हणजे खूप काही खर्च केला की लोक जमा होतील प्रसिद्दी मिळेल असं वाटलं असेल. पण त्याला काय माहित सेनेची शाखा काय चीज असते. किती वर्ष याच शाखांच्या बळावर बाळासाहेबांनी मुंबईवर सत्ता गाजवली...

बदलत्या काळात बाळासाहेबांची सेना कशी झालीय त्याच हे बोलकं उदाहरण..बरं भाजप ज्या स्टाईलनं पीआर करतं तसा प्रयत्न केला असेल पण सेना म्हणजे राडा आणि मोठा आवाज..त्यामुळे पीआर आणि सेना हे काही पटत नाही..मुळात सेनेला पीआरची गरज पडते आणि ती पीआरशिपही एखाद्या हिंदी भाषिक माणसाला दिली जाते ज्याला ओचा ठो माहित नाही..कठीण आहे न राव...