ग्रामीण महाराष्ट्राकडेही माझे लक्ष

राज ठाकरे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राकडे नवनिर्माण सेनेने दुर्लक्ष्य केलं अशी टीका होते, परंतु ही टीका स्वाभाविक आहे, पक्ष वाढवताना टप्प्याटप्याने पावलं टाकण्याचं मी ठरवलं आहे.

Updated: Dec 23, 2011, 03:45 PM IST

[caption id="attachment_3941" align="alignleft" width="150" caption="राज ठाकरे, गेस्ट एडिटर, झी २४ तास"][/caption]

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्राकडे नवनिर्माण सेनेने दुर्लक्ष्य केलं अशी टीका होते, परंतु ही टीका स्वाभाविक आहे, पक्ष वाढवताना टप्प्याटप्याने पावलं टाकण्याचं मी ठरवलं आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये निवडणुका लढवण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ माझ्याकडे नाही. त्यामुळे मी आता त्या लढवू इच्छित नाही. गेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत एका एका मतासाठी १० हजार रुपये द्यावे लागत होते. तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान, या भागात फेर फटका मारला तर तुमच्या सहज लक्षात येईल. तेवढा पैसा माझाकडे नाही.

 

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मी ठराविक मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं होतं आणि त्यात १३ जागांवर विजय मिळवला तसंच लोकसभेच्याही फक्त ११ जागा लढवल्या त्यात लाखाच्यावर मतं मिळवली. त्यामुळेच घाई गर्दी न करता महाराष्ट्रात सर्वत्र पोहचण्याचा मानस आहे. अशी वाटचाल करून राज्याची सत्ता काबीज करू.

 

शर?द पवारांना टोला 

देशाचे कृषी मंत्री शरद पवारांनी आपल्याला महाराष्ट्रात अधिक दौरा करण्याविषयी सल्ला दिला होता. त्यांना मी एकच सांगतो, आज महाराष्ट्रात जितके पण नेते असतील, त्यात शरद पवारचाही समावेश होतो. ज्यांनी खरोखर महाराष्ट्राच्या तालुका पातळीवर दौरा केला असले, अशा पहिल्या तीन नेत्यांमध्ये माझा क्रमांक लागतो.  महाराष्ट्रात तालुका पातळीवर मी आजवर पाचवेळा फिरलो आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याची भौगोलिक, आर्थिक, कृषी परिस्थिती मला चांगल्या रितीने माहिती आहे. आता हा सल्ला ते सुप्रियाताईंना किंवा अजितदादांना का देत नाही कदाचीत त्यांना त्यांच्याकडून फार अपेक्षा नसाव्यात.

 

अण्णांना सरकार दाद देणार नाही

अण्णा हजारेंचा मार्ग योग्य असला तरी त्यांच्या उपोषणाला निर्ढावलेली राजकारणी मंडळी दाद देणार नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यासाठी माझाच मार्ग योग्य असल्याचं सांगताना सत्तेत असलेल्या लोकांना त्रास होत नाही तोवर त्यांचे डोकं ठिकाणावर येत नाही.

 

[caption id="attachment_3942" align="alignleft" width="300" caption="राज ठाकरे, संपादकीय बैठकीत"][/caption]

 शेतीला ग्लॅमर हवे

शेतीला ग्लॅमर आणि उत्पन्न नसल्याने आजचा तरुण वर्ग त्याकडे वळत नाही. आज सामंत, चौगुले यासारखी मंडळी द्राक्ष बागातून शॅम्पेनच्या निर्मितीत उतरल्यानंतर त्याला एक ग्लॅमर प्राप्त झालं आहे आणि निर्यातीतून पैसेही चांगले मिळू लागल्याने तरुण शेतकरी वर्ग त्याकडे वळू लागला आहे.

 

आजकाल कोणालाही विचारलं तर त्याला डॉक्टर इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचं आहे पण शिक्षक कोणालाही व्हायचं नाही. दुसरं कोणतीही काम जमत नसल्यास कसंतरी डीएड बीएड होऊन सरकारी शिक्षक म्हणून भरती होण्याकडे तरुण वर्गाचा कल आहे. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रात दर्जाची घसरण झाली आहे. परदेशात शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टीकोन आदराचा असतो तशी आपल्याकडे परिस्थिती नाही ती निर्माण होणं गरजेचं आहे.

 

महाविद्यालयीन निवडणुका माझ्यामुळे बंद

राज्य सरकारने महाविद्यालयातील निवडणुकांवर बंदी घातल्याने कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रिया बंद पडली. या संदर्भात मी स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याकडे जाऊन या संबंधी मागणी केली होती, पण त्यांनी अर्धी मागणीच मान्य केली. त्यावेळेस महाविद्यालयातील विद्यापीठ प्रतिनिधींना फक्त पाच महिन्यांचा कालावधी मिळतो, तो दोन वर्षांचा करावा अशी मी मागणी केली होती ती मात्र, मान्य झाली नाही. महाविद्यालयातून विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून जाणाऱ्यांना कोणतेही अधिकार नसतात आणि केवळ वेळेचा अपव्यय त्यातून होतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि विद्यार्थिनींना डांबणे, निवडून आलेल्या प्रतिनिधींना पळवण