व्हिडिओ: पॉर्न वेबसाईटवर गाजतोय `रागिनी MMS २`चा ट्रेलर

पॉर्न स्टार सनी लिऑन कितीही म्हणत असली की तिला आपली जुनी बोल्ड इमेज बदलायची आहे. मात्र ते काही शक्य नाही. कारण तिचा आगामी चित्रपट `रागिनी MMS २`चा ट्रेलर पॉर्न वेबसाईटवर चांगलाच गाजतोय. नुकताच एकता कपूरच्या या सिनेमाचा ऑफिशिअल ट्रेलर रिलीज झालाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 4, 2014, 03:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पॉर्न स्टार सनी लिऑन कितीही म्हणत असली की तिला आपली जुनी बोल्ड इमेज बदलायची आहे. मात्र ते काही शक्य नाही. कारण तिचा आगामी चित्रपट `रागिनी MMS २`चा ट्रेलर पॉर्न वेबसाईटवर चांगलाच गाजतोय. नुकताच एकता कपूरच्या या सिनेमाचा ऑफिशिअल ट्रेलर रिलीज झालाय.
रागिनी एमएमएस २चा ट्रेलर एखाद्या अॅडल्ट चित्रपटापेक्षा कमी नाही. चित्रपट हॉरर पट असला तरी त्यात अश्लीलता खूप दिसते.
या चित्रपटात लेस्बियनचं नातं दाखवण्यात आलंय. येत्या २१ मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे. `रागिनी एमएमएस` या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. सनी लिऑनसोबत यात संध्या मृदूल आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉडी डबलचा वापर करण्यात आलेला नाही.
पाहा व्हिडिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.