www.24taas.com झी मीडिया, मुंबई
मराठीतला `टाईमपास` सिनेमा हाऊस फुल सुरू असतांना, विश्लेषकांनी या सिनेमाला जाडजूड भिंग लावून पाहण्याचं सुरूच ठेवलं आहे.
`टाईमपास` असं या सिनेमाचं नाव असतांना प्रकरण फारसं गंभीर घ्यायचं काही कारणचं नाहीय. ज्यांनी गंभीरतेने घ्यायचंय, त्या प्रेक्षकांनी गंभीरतेने घेतलंय, त्यांच्या हृदयाला हा सिनेमा टिचकी मारून गेला आहे, यामुळे प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा ट्रेस बस्टर `टाईमपास` दिग्दर्शकाने दिलाय, असं म्हटलं तर त्यात काहीही वावगं नाही.
सिनेमाचं विश्लेषण करणाऱ्यांनी सिनेमाकडे अधिक काटकोरपणे पाहिलं तर जरा हवा आने दे असंच प्रेक्षक म्हणतील.
मराठीत यापूर्वी रडवणारे सिनेमेही चालले आहेत. रडवणारे सिनेमे गेल्यानंतर रडवणारी नावं असणारे चित्रपटही मराठीत आले, तेव्हा विश्लेषकांनी आपला जाडजूड भिंगाचा चष्मा काढून ठेवला होता की काय?, असा सवाल उपस्थित होतोय.
टाईमपास हा बारका पहेलवान थ्रीडी शोले समोर पाय रोवून उभा आहे. कुमारवयीन मुलांची प्राजक्ता-दगडूची प्रेमकहाणी युवकांनी एकीकडे हवी हवीशी वाटतेय. तर दुसरीकडे शोल थ्रीडी च्या रूपाने पुन्हा प्रेक्षकांसमोर आला आहे. पहिल्यांदा हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी रिलीज झाला होता. तेव्हा सुरूवातीला शोलेलाही चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता, मात्र नंतर शोलेला प्रेक्षकांनी चल धन्नो म्हटलं आणि शोलेने मागे वळून पाहिलं नाही.
शोलेचे मुख्य कलाकार अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, धर्मेंद्र, अमजद खान आणि संजीव कुमार यांच्यासमोर, नकळत का असेना, पुन्हा तिसऱ्या पिढीसमोर थ्रीडीच्या माध्यमातून समोर आपलं स्थान निर्माण करावं लागणार आहे. यातील काही कलाकार आज जगात नाहीत. शोलेला ८० आणि ९० ज्या दशकांत जिथेही प्रदर्शित करण्यात आलं, तिथे शोले ने कमाल करून दाखवली.
शोले थ्रीडीच्या रूपात आला असतांना, दुसरीकडे प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकरचा टाईम पास सिनेमा नव्या पिढीची मनं जिकंतोय, हे निश्चितच उल्लेखनीय म्हणावं लागेल. दगडू-प्राजक्ताची केमेस्ट्री सर्वांना भावतेय, हे सांगण्यासाठी आता विश्लेषकांची गरज नाही.
शोलेच्या संवादांएवढे टाईमपासचे संवाद लोकप्रिय निश्चितच होणार नाहीत, तशी तुलनाही करणं हास्यास्पद आहे. पण काळ बदलला आहे, आणि दगडू आणि प्राजक्ताच्या प्रेमाने प्रेक्षकांना वेड लावलंय, हे निश्चित.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.