बीग बी-जयासोबत काम करण्यास अभि-अॅशचा नकार

बॉलिवूडचा ज्युनिअर बी अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन यांनी महानायक बीग बी आणि जया बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असताना चक्क ही संधी धुडकावून लावलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 12, 2014, 08:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा ज्युनिअर बी अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन यांनी महानायक बीग बी आणि जया बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असताना चक्क ही संधी धुडकावून लावलीय.
अमिताभ बच्चन यांचे मेकअप मॅन दीपक सावंत ‘लीडर’ नावाचा एक सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना साईन केलं गेलंय. दीपक सावंत यांनी यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत गंगा, गंगोत्री आणि गंगादेवी या तीन भोजपुरी सिनेमांत काम केलंय.
दीपक सावंत यांच्या या सिनेमात अमिताभ बच्चन एका छोट्या खेड्यातील एक सन्मानित शाळा शिक्षकाच्या भूमिकेत दिसतील, अशी चर्चा आहे तर जया या शिक्षकाच्या पत्नीच्या भूमिकेत दिसतील. दीपक यांनी ऐश्वर्याला याच सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या सूनेची भूमिकेची ऑफर दिली होती. परंतु, गोष्ट काही जमली नाही.
दीपक यांनी याच सिनेमात अमिताभ यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी अभिषेक बच्चनला ऑफर दिली होती तर त्यानंही पत्नीप्रमाणेच या सिनेमाला नकार देऊन टाकला. भोजपुरी सिनेमाचा सुपरस्टार दिनेश लाल निरहुआ आता अमिताभच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या सिनेमात गुलशन ग्रोवर एका भ्रष्टाचारी नेत्याच्या भूमिकेत दिसेल. हा सिनेमा अभिषेक चड्डा दिग्दर्शित करणार आहेत. अभिषेक चड्डा यांनी गंगा, गंगोत्री आणि गंगादेवा या सिनेमांचंही दिग्दर्शन केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.