अभिनेत्री दिप्तीला सोसायटीच्या सदस्यांनी केलं अपमानीत

अभिनेत्री दिप्ती नवल यांनी आपल्या सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांबाबत संताप व्यक्त केला.

Updated: Mar 28, 2013, 04:50 PM IST

www.24taas.com, मुंबई
अभिनेत्री दिप्ती नवल यांनी आपल्या सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांबाबत संताप व्यक्त केला. बॉलिवूडमधील ८० च्या दशकातील प्रसिद्ध जोडी अभिनेत्री दिप्ती नवल आणि अभिनेता फारूख शेख यांना त्यांच्या सोसायटीच्या सदस्यांनी अपमानीत केले आहे. एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संताप व्यक्त केला.
अंधेरी येथील राहाते घर सोडून दिप्ती नवल सध्या दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये गेल्या आहेत. दिप्ती नवल यांना त्यांच्या सोसायटीतील सदस्यांनी वाईट वागणूक दिल्याचे समजते आहे.
शुक्रवारी फारुख शेख आणि दिप्ती यांची त्यांच्या निवसास्थानी एका टीव्ही चॅनलसाठी मुलाखत सुरू होती. त्याचवेळी सोसायटीचे सदस्य तिथे आले आणि त्यांनी सोसायटीमध्ये असले प्रकार चालणार नाहीत असे त्यांना सुनावले. ही निवासी सोसायटी असून इथे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. माध्यमांना इथे बोलावून मुलाखती देणे सोसायटीच्या नियमांविरुद्ध असल्याचे त्यांनी दिप्ती यांना सुनावले.