अभिनेत्री प्रीती झिंटाला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

अभिनेत्री प्रीती झिंटा हिची २ कोटी रुपयांची गुंतवणूक तिच्या अंगाशी आली. कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक करूनही तिने ती केली नसल्याचा दावा ताजदार आमरोही आणि त्याच्या कुटुंबियांनी केला होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सांगत प्रीतीन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 4, 2013, 05:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री प्रीती झिंटा हिची २ कोटी रुपयांची गुंतवणूक तिच्या अंगाशी आली. कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक करूनही तिने ती केली नसल्याचा दावा ताजदार आमरोही आणि त्याच्या कुटुंबियांनी केला होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सांगत प्रीतीन मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ताजदार आणि त्याच्या कुटुंबाला घर न विकण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायलयानं दिले आहेत. येत्या १३ जानेवारीपर्यंत ताजदार आणि इतर प्रतिवादींना मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आहे. प्रीती झिंटाने ताजदार आमरोही आणि त्याच्या परीवारच्या सांगण्यावरुन त्यांच्याकडे २ कोटी रुपये गुंतवणूक केली होती. पण नंतर आमरोही परीवारानं प्रिती झिंटाने हे पैसे आपल्याकडे गुंतवले़च नाही असं सांगून हात वर केले होते.
या प्रकरणी प्रिती झिंटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने प्रीतीच्या अर्जावर सुनावणी करताना ताजदार आमरोही आणि कुटुंबाला घर विकू नका, असे बजावलेय. त्यामुळे या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रीती झिंटाला दिलासा मिळालाय. आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.