www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडमधील बॉक्स ऑफिसवर ‘दबंग’गिरी करणारा सलमान खान आज ४८ वर्षात प्रर्दापण केले. आज सलमान खानचा ४८ वा वाढदिवस आहे. सलमानचे चाहते त्याला सोशल नेटवर्किंग साईट द्वारे शुभेच्छा देत आहे.
सलमान खानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ मध्ये मध्यप्रदेशमधील इंदोरमध्ये झाला. सलमानने १९८८ साली `बीवी हो तो ऐसी` या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर एक वर्षानी त्याचा ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरला. बॉलिवूडमध्ये दबंगची ओळख याच चित्रपटातून चाहत्यांना झाली.
सलमानचा वॉंटेड, दबंग, दबंग-2 आणि एक था टाइगर या सर्व चित्रपटानी बॉक्स ऑफिसवर 100 कोटी पेक्षा ही जास्तीचा गला करता आला. या चित्रपटाच्या व्यतिरिक्त दबंगने साजन, हम आपके हैं कौन, तेरे नाम आणि हम दिल दे चुके सनम या सारख्या चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तसेच सलमानने रियलिटी शो ‘दस का दम’ आणि ‘बिग बॉस’ द्वारे टी.व्हीवर आपली हजेरी लावून चाहत्याना भुरळ घातली. तसेच बॉलिवूडच्या दबंगला दुसऱ्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी निर्मात्यांना तब्बल ५० कोटी रुपये मोजावे लागतात.
सलमान खानचे ‘एसकेबीएच’ प्रॉडक्शन म्हणजेच सलमान खान बिंग ह्यूमन प्रॉडक्शन या नावाने त्याची स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी आहे. या प्रॉडक्शन कपंनीची सुरुवात सलमानने २०११ मध्ये केली होती. या प्रॉडक्शन कपंनी द्वारे पहिला चित्रपट ‘चिल्लर पार्टी’ बनवण्यात आला या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. सलमान खान बिंग ह्यूमन नावाने सामाजिक संस्था देखील चालवतो. त्याच प्रमाणे बॉलिवूडचा दबंग गणपती बाप्पाचा भक्त आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.