करीनामुळे दणाणले छत्तीसगढ सरकारचे धाबे

करीना कपूर ही पतौडी संस्थानाची बेगम जरी झाल्यावर तिचे नखरे आणखीनच वाढले आहेत. तिच्या नखऱ्यांनी छत्तीसगढ सरकारही हैराण झालं आहे. छत्तीसगढ राज्याच्या राज्योत्सवात करीना कपूरचा डान्स सादर होणार होता. मात्र करीनाने मानधन मिळाल्याशिवाय कार्यक्रमाला न येण्याची धमकी दिल्यामुळे छत्तीसगढ सरकारचे धाबे दणाणले

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 1, 2012, 02:12 PM IST

www.24taas.com, मुंबई
करीना कपूर ही पतौडी संस्थानाची बेगम जरी झाल्यावर तिचे नखरे आणखीनच वाढले आहेत. तिच्या नखऱ्यांनी छत्तीसगढ सरकारही हैराण झालं आहे. छत्तीसगढ राज्याच्या राज्योत्सवात करीना कपूरचा डान्स सादर होणार होता. मात्र करीनाने मानधन मिळाल्याशिवाय कार्यक्रमाला न येण्याची धमकी दिल्यामुळे छत्तीसगढ सरकारचे धाबे दणाणले
छत्तीसगढ राज्याच्या राज्योत्सव या कार्यक्रमामध्ये करीना कपूरचा डान्स धमाका आयोजित करण्यात आला होता. मात्र तिला सरकारकडून सांगण्यात आलेलं मानधन देण्यात आलं नसल्यामुळे तिने कार्यक्रमाला येणार नसल्याचं जाहीर केलं. तसंच सरकारने ब्रँड प्रमोशनसाठी आपल्या नावाच वापर करू नये, असं आपल्या मॅनेजरतर्फे छत्तीसगढ सरकारला कळवून टाकलं.
करीनाने यायला नकार दिल्याचं कळताच छत्तीसगढ सरकारकडून वरच्या पातळीवर हलचाली होऊन करीनाच्या बँक अकाउंटमध्ये तिचं ठरलेलं १ कोटी १० रुपयांचं मानधन जमा करण्यात आलं. मानधन मिळाल्याची खात्री पटल्यानंतरच करीना कपूर कार्यक्रमाला येण्यास तयार झाली. यासाठी करीनासाठी विशेष चार्टर प्लेनचीही सोय करण्यात आली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x