फिल्म रिव्ह्यू : कंटाळवाणा `बेशरम`

`दबंग` सिनेमातून पूर्णपणे नवा सलमान खान लोकांसमोर आणून दाखवणाऱा दिग्दर्शक अभिनव कश्यप आपला दुसरा सिनेमा इतका कंटाळणावणा बनवेल, असं वाटलं नव्हतं. मात्र `बेशरम` हा अत्यंत रटाळ सिनेमा आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 2, 2013, 05:53 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
`दबंग` सिनेमातून पूर्णपणे नवा सलमान खान लोकांसमोर आणून दाखवणाऱा दिग्दर्शक अभिनव कश्यप आपला दुसरा सिनेमा इतका कंटाळणावणा बनवेल, असं वाटलं नव्हतं. मात्र `बेशरम` हा अत्यंत रटाळ सिनेमा आहे. अनेक सिनेमांचं मिश्रण करून `बेशरम`चं कडबोळं झालं आहे. रणबीर कपूरचा अभिनय चांगला असला, तरी कथेमध्ये दम नाही. सादरीकरणही अतिशय कंटाळणं आहे.
काय आहे कथा?
अनाथ असणारा बबली (रणबीर कपूर) हा कार मेकॅनिक असतो. प्रत्यक्षात मात्र तो कार चोरणारा चोर असतो. मात्र आपल्या चोरीतील काही पैसे तो आपल्या अनाथाश्रमात दान करत असतो. मुंबईतील एक ठीकठाक आणि बऱ्यापैकी पैसे मिळवणारी तारा शर्मा (पल्लवी शारदा) आपल्या मैत्रिणींवर इम्प्रेशन मारण्यासाठी मैत्रिणीच्या लग्नात नवी कोरी मर्सिडिज एमयुव्ही कार घेऊन येते. बबली ही कार चोरतो. ताराच्या पर्रेमात पडलेल्या बबलीला नंतर आपली चूक लक्षात येते. त्यानंतर आपल्या प्रेयसीची कार परत मिळवून देण्याची प्रतिज्ञा बबली करतो. त्यासाठी एकच अट ताराला घालतो. जिथे त्याने कार विकली असते, तिथे चंडिगढमध्ये ताराने बबलीसोबत यायचं. चंडिगढच्या प्रवासात फारसं काही घडत नाही. ज्याला बबली कार विकत असतो, तो खलनायक चंडेल (जावेद जाफ्री) आणि बबली यांच्यात होणारी अखेरची मारामारी, त्यास,ठी अनाथाश्रमातील मुलांना ओलीस ठेवणं या अनेक घटना सिनेमात आहेत. मात्र त्या रंगतदार ठरत नाहीत. या सिनेमात चुलबुल चौटाला या पोलिसाचं काम ऋषी कपूरने केलं आहे. चुलबुल चौटाला आणि त्याची पोलीस पत्नी (नीतू सिंग-कपूर) या दोघांनी मात्र धमाल उडवून दिली आहे.
अभिनय
रणबीर कपूर, जावेद जाफ्री यांचा अभिनय चांगला आहे. नवोदित पल्लवी शारदाही चांगली अभिनेत्री आहे. मात्र सिनेमात ऋषी कपूर आणि नीतू कपूर जेवढी धमाल आणतात, तेवढी इतर कुठल्याच प्रसंगात जाणवत नाही. जर सिनेमात ऋषी कपूर आणि नीतू सिंग नसते, तर हा संपूर्ण सिनेमा बघणं अशक्य झालं असतं.
हा सिनेमा का पहावा?
ऋषी कपूर आणि नीतू सिंग-कपूरचा भन्नाट अभिनय. त्यांच्यातील केमिस्ट्री यांसाठी हा सिनेमा पाहावा. रणबीर कपूरचे फॅन्स पूर्णपणे निराश होणार नाहीत. रणबीरचा अभिनयही चांगला आहे.
का पाहू नये?
अनेक सिनेमांचं मिश्रण यात आहे. थोडासा ‘दबंग’, थोडासा ‘अजब प्रेम की गजब कहानी’, थोडं ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ असं सर्वांचं मिश्रण या सिनेमात आहे. त्यामुळे फ्रेश काहीच नाही. अभिनय ठीकठाक असले तरी त्यात काहीच नाविन्य नाही. गाणी फारशी गाजलेली नाहीत. एकंदर हा सिनेमा एखाद्या दक्षिणात्य सिनेमाचं स्वस्तात केलेला हिंदी रिमेक वाटतो.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.