www.24taas.com,झी मीडिया, वॉशिंग्टन
प्रसिद्ध भारतीय धावपटू मिल्खा सिंग याच्या जीवनावर आधारित असा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट अमेरिकेत सुसाट वेगात धावतोय. या चित्रपटाने अमेरिकेत पहिल्याच आठवड्यात तब्बल ६ लाख ४७ हजार डॉलरची कमाई केलीय.
राकेश मेहरा यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटाने अमेरिकेतील पॉप्युलॅरिटी चार्टमध्ये या आठवड्यात १५ वे स्थान पटकावलयं. अमेरिकेच्या टॉप चित्रपटांवर नजर ठेवणाऱ्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या १४० चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवला जातोय आणि या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच ६,४७,११२ डॉलरची कमाई केली.
१२ जुलैला हा चित्रपट दाखवण्यास अमेरिकेत सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवसात १,८३.०८३ डॉलर या चित्रपटाने मिळवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी ही कमाई २,७०,२७५ इतकी वाढली. रविवारी चित्रपटगृहात एकूण १,९३,७७४ डॉलरचा बिझनेस या चित्रपटाने केला.
‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात मिल्खा यांची भूमिका फरहान अख्तर याने केली. चित्रपटांतील फरहानच्या भूमिकेचही हॉलिवूड रिपोर्टरनी कौतुक केलंय. मिल्खा यांची भूमिकेसाठी फरहानला निवडणं यामागे काही ठोस कारण होते, असे मेहरा म्हणाले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.