खबरदार! परवानगीशिवाय माधुरीचा `गुलाब गँग` प्रदर्शित केला तर ...

माधुरी दीक्षितचा अभिनय असलेला सिनेमा`गुलाबी गँग` हा सिनेमा बुलेलखण्डमधील `गुलाबी गँग`च्या जीवन-संघर्षावर आधारीत आहे.

Updated: Jan 8, 2014, 12:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माधुरी दीक्षितचा अभिनय असलेला सिनेमा `गुलाब गँग`, आमच्या परवानगीशिवाय रिलीज केली, तर रस्तावर उतरून आंदोलन करू, असा इशारा सम्पत पाल यांनी दिला आहे.
सम्पत पाल या बुंदेलखण्डमधील महिलांवरील अन्यायाविरोधात लढणाऱ्या `गुलाबी गँग`च्या नेत्या आहेत.
माधुरी दीक्षितचा अभिनय असलेला सिनेमा`गुलाबी गँग` हा सिनेमा बुलेलखण्डमधील `गुलाबी गँग`च्या जीवन-संघर्षावर आधारीत आहे.
बुंदेलखण्ड सारख्या भागात महिलांच्या अधिकारांसाठी आवाज उठवण्याचं काम `गुलाबी गँग` करते, हा सिनेमा `गुलाबी गँग`वर आधारीत आहे, मात्र `गुलाबी गँग`वर सिनेमा बनवण्याआधी आपल्याला विचारणा करण्यात आली नाही, हे योग्य नाही, हा सिनेमा जर रिलीज झाला, तर आपण आंदोलन करू असा इशारा सम्पत पाल यांनी दिला आहे.
सम्पत पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, `गुलाब गँग` हा चित्रपट गुलाबी गँगवरून बनवला जात आहे, या वरून आपण निर्माता आणि दिग्दर्शकाला मागील महिन्यात बांदाहून नोटीस देखिल पाठवली होती.
मात्र तुम्हाला माधुरी दीक्षितच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल, असं सांगण्यासाठी एक व्यक्ती बांदाला आला होता. आम्ही ऍवॉर्ड देण्याच्या या गोष्टीला विरोध केला आहे. या चित्रपटाचे निर्माते अनुभव सिन्हा तर दिग्दर्शक सौमिक सैन आहेत.
गुलाबी गँगच्या नेत्या काँग्रेस समर्थक
गुलाबी गँगच्या नेत्या सम्पत पाल यांनी २०१२ साली उत्तर प्रदेशच्या माणिकपूरमधून, काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी लोकसभेची निवडणूक बांदामधून लढवण्याची मागणी सोनियांकडे केली आहे. जर त्यांनी तिकीट मिळालं नाही, तरी त्या काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार करणार आहेत.
तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत गुलाबी गँग सोनियांसाठी रायबरेली तर राहुल गांधींसाठी अमेठीतून प्रचार करणार आहे.
आपल्याला इतर पक्षांकडूनही तिकिटची ऑफर मिळाली आहे. मात्र आपण काँग्रेसची उमेदवारी अथवा पाठिंब्यावर ठाम असल्याचं सम्पत पाल यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी जरी आपल्याला भाजपचं लोकसभेचं तिकीट ऑफर केलं, तरी आपण भाजपकडून निवडणूक लढवणार नसल्याचं सम्पत पाल यांनी म्हटलं आहे.
कारण आपल्यावर खोटे गुन्हे दाखल झाले तेव्हा आपल्याला काँग्रेसने मदत केली भाजपने नाही, असं सम्पत पाल यांनी म्हटलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.