www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री कतरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबद्दलची चर्चा बॉलिवूडमध्येही चांगलीच रंगतेय. वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी हे लव्हबर्ड्स एकत्र दिसतात. मात्र याबाबत कोणीही स्पष्ट वाच्यता करत नाहीय.
स्पेनमध्ये रणबीर-कॅटनं घालवलेल्या सुट्टीचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर तर हे प्रकरण चांगलंच गाजलं. मात्र अजूनही हे दोघं सार्वजनिकरीत्या गुप्तता पाळून आहेत. मध्यंतरी करीनानं कतरीनाचा उल्लेख ‘भाभी’ असा केल्यानं या प्रकरणावर शिक्कामोर्तब झालं की काय, असं वाटतं होतं.
मात्र, आता बॉलिवूडच्या नुकत्याच मिळालेल्या माहितीवरुन रणबीर-कतरीना हे प्रेमीयुगुल कदाचितच लग्नाच्या बेडीत अडकतील. कारण कतरीनाला करिअरवर फोकस करायचंय. तिला आत्ताच लग्न करायचं नाहीय. तर रणबीर कपूर आता २८ वर्षांचा होतोय. त्याला हे वय लग्नासाठी योग्य वाटतं. त्याला लग्न करायचंय.
त्यामुळं आता आगामी २०१४ साली रणबीर-कतरीनाची लग्नाची घंटा वाजते की कतरीना रणबीरचा लग्नाचा प्रस्ताव नाकारते, हे पाहावं लागेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.