आता आयुष्यात कधीच बिकिनी घालणार नाही- कतरिना

बिकिनीमधील फोटो लीक झाल्यामुळे कतरिना प्रचंड अस्वस्थ असल्याचं तिच्या एका जवळच्या व्यक्तीकडून समजलं आहे. घडल्या प्रकाराबाबत स्वतःला दोष देत कतरिना वैतागल्याचंही सांगण्यात आलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 6, 2013, 07:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘बूम’ या बोल्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कतरिनाला करिअरच्या सुरूवातीलाच वादांना सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी आपण अशा प्रकारच्या बोल्ड फिल्म्स पुन्हा करणार नाही, असं तिने जाहीर केलं, आणि तिने ते वचन पाळलंही. आताही कतरिनाच्या फोटोंवरून निर्माण झालेल्या वादावर तिने नवी शपथ घेतली आहे.
काही दिवसांपूर्वी कतरिना कैफ स्पेनमध्ये रणबीर कपूरसोबत सुट्टी घालवत होती. त्यावेळी स्पेनमधील बीचवर रणबीर कपूरसोबत ती बिकिनीमध्ये आढळली होती. तिचे बिकिनीमधील फोटो लीक झाल्यामुळे ती प्रचंड अस्वस्थ असल्याचं तिच्या एका जवळच्या व्यक्तीकडून समजलं आहे. घडल्या प्रकाराबाबत स्वतःला दोष देत कतरिना वैतागल्याचंही सांगण्यात आलंय. गर्दी असलेल्या बीचवर टू पीस बिकिनी घातल्यामुळेच हा गोंधळ जाला, असं तिला वाटतंय. गर्दीमध्ये जेव्हा काही भारतीय चेहरे कतरिनाला दिसले, तेव्हाच तिला भीती वाटली होती. मात्र नंतर घडलेल्या प्रकारामुळे ती कमालीची नाराज झाली आहे.
यापुढे बीच असो वा स्वीमिंग पूल, कुठेही टू पीस बिकिनी नघालण्याचा निर्णय कतरिनाने घेतला आहे. सिनेमामध्ये अशा प्रकारचं कुठलंही दृश्य न देण्याचा निर्णय तिने घेतला आहे. यापुढे बिकिनीऐवजी शॉर्ट्स आणि टॉप असा पोषाख परिधान करण्याची शपथ तिने घेतली आहे.
आगामी ‘धूम ३’ या सिनेमात कतरिना कैफचा बिकिनी सीन शूट होणार होता. मात्र तिथेही आपण पुन्हा कधीच बिकिनी घालणार नसल्याचं कतरिनाने सांगितल्यामुळे या सिनेमातही कतरिना बिकिनीमध्ये दिसणार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.