सलमान खान पाकिस्तानात!

हसनैन नामक पाकिस्तानातील सियालकोट येथील तरुण चक्क सलमान खानसारखा दिसतो. त्याने आपली बॉडीही सलमान खानसारखी बनवली आहे. सलमान खानच्या नवनव्या हेअरस्टाइलप्रमाणे तोही आपली हेअरस्टाईल बदलत असतो.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 6, 2013, 04:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सियालकोट
सलमान खानची क्रेझ जगभरात आहे. त्याचे लूक्स, त्याची बॉडी, त्याची स्टाईल याचे अनेक चाहते आहेत. गेले काही वर्षं तर सलमान खानला पडद्यावर पाहाण्यासाठी त्याचे फॅन्स इतके वेडे झाले आहेत, की सलमानचे लागोपाठ काही सिनेमे १०० कोटी रुपयांच्या वर बझनेस करून गेले. पण इंटरनेटवर मात्र चर्चा सुरू आहे ती वेगळ्याच सलमान खानची... हा सलमान खान भारतातला नाही, तर पाकिस्तानातला आहे.
हसनैन नामक पाकिस्तानातील सियालकोट येथील तरुण चक्क सलमान खानसारखा दिसतो. त्याने आपली बॉडीही सलमान खानसारखी बनवली आहे. सलमान खानच्या नवनव्या हेअरस्टाइलप्रमाणे तोही आपली हेअरस्टाईल बदलत असतो. पाकिस्तानात तर हसनैनची लोकप्रियता तुफान वाढते आहे. सलमान खानचे पाकिस्तानी फ२न्सतर हसनैनबरोबर आपले फोटो काढून घेतात आणि सलमानला भेटल्याचा आव आणतात.
सलमान खानच्या या डुप्लिकेटवर पाकिस्तानी टीव्ही चॅनलने एक विशेष कार्यक्रमही केला. तसंच चान्नई एक्स्प्रेस सिनेमाचे पाकिस्तानातील डिस्ट्रिब्युटर बनवत असलेल्या पाकिस्तानी सिनेमात हसनैन प्रमुख भूमिका करणार आहे. मात्र काही डिस्ट्रिब्युटर्सच्या मते डुप्लिकेट सलमान खान खऱ्या सलमान खानइतका कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x