www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टाईमपास सिनेमातल्या प्राजक्ताने तर आधीच आपल्याला वेड लागलं असल्याचं सांगितलंय. मात्र आपला दगडूही आता येडा झाला आहे.
कारण आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो, टाईमपास सिनेमा २८ कोटी रूपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय. यामुळे आनंदात आपला दगडू थोडासा का होईना `येडा` झालाय.
दुनियादारी हा सिनेमा टाईमपास पेक्षा अनेक दिवस आधी आला आहे. तरीही दुनियादारीची बरोबरी करण्यासाठी आता टाईमपासला अवघा १ कोटी रूपयांचा टप्पा गाठावा लागणार आहे.
अर्थातच हा टप्पा निश्चितच पार होईल, कारण टाईमपास हा मराठीतील सर्वात वेगाने गल्ला जमावणारा सिनेमा ठरला आहे.
'टाईमपास'ची गाणी लोकांनी डोक्यावर नाही तर डोक्यात घेतली आहेत. फुलपाखरू छान किती दिसते, या गाण्याच्या लोकप्रियतेची लहर आली आहे. आणि कहर असा झालाय की, 'थ्रीडी शोले'लाही आपल्या टाईमपास सिनेमाची बरोबरी करता आलेली नाही.
शोलेलाही 'चल धन्नो' हो बाजूला असं सांगून टाईमपासने बाजूला सारलं आहे. ज्यांना टाईमपास सिनेमा आवडला, आणि ज्यांना नाही आवडला त्यांनीही, हा सिनेमा पुन्हा पुन्हा जाऊन पाहिला आहे.
एवढंच नाही तर टाईमपास सिनेमा अजुनही सर्वत्र हाऊसफुल्ल सुरू असल्याने, अजून टाईमपास पाहता आलेला नाही, असं सांगणारे प्रतिक्षेत असणारे अनेक आहेत.
दगडू आणि प्राजक्ताचीही केमेस्ट्री अनेकांना घायाळ करते, या सिनेमातलं भोळंभाबळं प्रेम अनेकांना आवडलंय. या सिनेमाने मराठी सिनेमात एक नवा ट्रेन्ड आणलाय, पण दगडू आणि प्राजक्ताची सर कुणालाच येणार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.