बिग बॉस 6 मध्ये किम कार्डेशिआन नाहीच

सध्या चर्चेत असलेला बिग बॉस-६ रिअलिटी शो अखेर ७ ऑक्टोबर रोजी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सलमान खान बिग बॉस-६ चं सलग तिसऱ्यांदा निवेदन करणार आहे. त्याने शोचं ‘अलग छे’ म्हणत प्रमोशनही दणक्यात केलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 3, 2012, 04:08 PM IST

www.24taas.com, मुंबई
सध्या चर्चेत असलेला बिग बॉस-६ रिअलिटी शो अखेर ७ ऑक्टोबर रोजी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सलमान खान बिग बॉस-६ चं सलग तिसऱ्यांदा निवेदन करणार आहे. त्याने शोचं ‘अलग छे’ म्हणत प्रमोशनही दणक्यात केलंय. कोणकोणते कलाकार बिग बॉस-६ मध्ये सहभागी होणार आहेत त्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती, त्याचे रहस्यही आता सर्वांसमोर आलय.
बिग बॉसच्या सिझन ४ आणि ५ मध्ये इंटरनॅशनल सेलिब्रिटींचा समावेश केला गेला होता. साहजिकच या सिझन मध्येही तसचं काही असणं स्वाभाविकचं आहे. ह्या आधीच्या सिझन मध्ये पामेला अंडरसन आणि सनी लिओन यांचा समावेश करण्यात आला होता. तसचं बिग बॉस -६ च्या प्रोमो मध्ये इंटरनॅशनल सेलिब्रिटी किम कार्डेशिअनला झळकवण्यात आले होते. याबाबत शोबद्द्ल चाहत्यांनी अतिशय उत्सुकता दर्शवली होती.
पण आता अशी बातमी समोर आलीय की किम कार्डेशिअनने बिग बॉस ६ मध्ये दिसणार नाहीये. किमने असं ट्विट केलयं की नॉट ट्रू स्टोरी( ही खरी बातमी नाहीय). बिग बॉस-६ च्या प्रर्दशित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये किमलाही दाखवण्यात आले होते. तिचं आता असं म्हणणं आहे की माझे भारतात सध्यातरी येण्याचा काही चान्स नाही. किम सध्या बहिण कर्टनी सोबत “टेक मियामी” या शो मध्ये व्यस्त आहे.