www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
ज्येष्ठ अभिनेते प्राण आज अनंतात विलीन झाले. शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गजमंडळी उपस्थित होती.
प्राण यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी बिग बी अमिताभ बच्चन, करण जौहर, अनुपमखेर, गुलजार, रजामुराद, टीनूआनंद, शक्ति कपूर आदी मंडळी उपस्थित होती.
‘यमला जट’ हा प्राण यांचा पहिला चित्रपट होता. फाळणीनंतर प्राण मुंबईला आहे, फिल्म खानदान मध्ये त्यांनी हिरोची भूमिका केली होती. आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक चित्रपटात प्राण यांनी भूमिका केल्या आहेत. त्यातील त्यांच्या खलनायकाच्या भूमिका अजरामर ठरल्या.
उपकार, जंजीर, डॉन, दुनिया हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. आपल्या जबदस्त अभिनयाने बॉलिवुडच्या चित्रपटात जीव(प्राण) टाकणाऱ्या प्राण यांची प्राणज्योत काल मालवली. ते ९३ वर्षांचे होते. प्राण यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
केंद्र सरकारतर्फे मे महिन्यात प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. प्राण यांच्या मुंबईतील राहत्या घरी येऊन, दूरसंचारमंत्री मनिष तिवारी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.