www.24Taas.com, चेन्नई
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांची सर्वाधिक चर्चित आणि बहुप्रतिक्षित `कोच्चाडय्यन` या तामिळ सिनेमाचा फर्स्ट लूक सोमवारी लाँच करण्यात आला. अवघ्या एका दिवसात या फर्स्ट लूकला युट्यूबवर १० लाखांहून जास्त हिट्स मिळवत रजनीकांतने आपला करिश्मा दाखवून दिला आहे
कोच्चडाय्यन हा ऐतिहासिक सिनेमा असून यात आठव्या शतकातील पंड्या राजा कोच्चाडय्यन राणाधिरन याच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या आर. अश्विन हिने केलं आहे. सौंदर्याचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे भारतात पहिल्यांदाच मोशन कॅप्चर टेक्नोलॉजी वापरण्यात आली आहे. अशी टेक्नोलॉजी हॉलिवूडमधील ‘टिनटिन’, ‘पोलर एक्सप्रेस’ आणि ‘अवतार’ सारख्या सिनेमांमध्ये वापरण्यात आली होती.
सिनेमाच्या प्रोमोमध्ये रजनीकांतची वेगळी ओळख करून देण्यात येते.“अनेक हिरोज आहेत... अनेक सुपरहिरोजही असू शकतात... मात्र एकच...” असं पडद्यावर येताच योध्याच्या भूमिकेतील रजनीकांत यांची भव्य एंट्री पाहायला मिळते.
या सिनेमात रजनीकांतसोबत दीपिका पदुकोण आहे. सिनेमाचं संगीत ए आर रहमानचं असून स्वतः रजनीकांतने एक गाणं या सिनेमात गायलं आहे. प्रादेशिक सिनेमा असूनही या सिनेमाच्या फर्स्ट लूकला एका दिवसात १० लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत. हा एक विक्रमच आहे. यातून वयाच्या ६२ व्या वर्षीही रजनीकांतने आपलं स्टारडम दाखवून दिलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.