सलमान खानने शोधलं नव्या गर्लफ्रेंडसाठी घर!

आपली तथाकथित गर्लफ्रेंड लुलिया वंटुरसाठी सलमान खानने कार्टर रोड येथे घर शोधलं आहे. या आधीही सलमान खानने आधीची गर्लफ्रेंड कतरिना कैफसाठी घर मिळवलं होतं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 4, 2013, 05:16 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा `दबंग` म्हणजेच सलमान खान हा इतरांना मदत करण्यत नेहमीच तत्पर असतो. विशेषतः सिनेसृष्टीत पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या नवोदित अभिनेत्रींचा सलमान खान हा मोठा आधार ठरतो. आता आपली तथाकथित गर्लफ्रेंड लुलिया वंटुरसाठी सलमान खानने कार्टर रोड येथे घर शोधलं आहे. या आधीही सलमान खानने आधीची गर्लफ्रेंड कतरिना कैफसाठी घर मिळवलं होतं.
४७ वर्षीय सलमान खान गेले ३ महिने आपल्या कुटुंबासोबत कार्टर रोड येथे राहात आहे. या भागात त्याने लुलियासाठी घर मिळवलं आहे. सलमान खानचं घर असलेल्या बँड्रामधील गॅलेक्सी हाईट्स या इमारतीचं नुतनीकरण सुरू असल्यामुळे सलमान सध्या कार्टर रोडलाच राहात आहे.
सध्या सलमान खानचं आणि रोमानियन टीव्ही अभिनेत्री लुलिया वंटुरचं प्रेमप्रकरण चर्चेत आहे. ‘मेंटल’ सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सलमान खान लुलियासोबतच सतत असायचा. दोघांनी चोरून लग्न केल्याच्या वावड्याही उठल्या होत्या. मात्र सलमानचे वडील सलीम खान यांनी या अफवांचं खंडन केलं होतं. एक मात्र खरं, की लुलियावर सलमान खान सध्या जरा जास्तच मेहेरबान झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.